गोव्यात दिल्लीच्या युवकाला गांजासह पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 19:59 IST2020-09-30T19:59:09+5:302020-09-30T19:59:17+5:30

पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित वेळीप पुढील तपास करीत आहेत.

In Goa, a Delhi youth was caught with marijuana | गोव्यात दिल्लीच्या युवकाला गांजासह पकडले

गोव्यात दिल्लीच्या युवकाला गांजासह पकडले

मडगाव : गोव्यातील कोलवा या समुद्रकिनारी शंकर महूर या एकवीस वर्षीय मूळ दिल्ली येथील युवकाला पोलिसांनी पकडून त्याच्याकडील ७0 ग्राम गांजा जप्त केला. शंकर महूर (२१) असे संशयिताचे नाव असून, तो कोलवा येथे एका बारमध्ये कामाला होता.
आज बुधवारी दुपारी कोलवा किनाऱ्याजवळील पार्किंगच्या जागी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे सात हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित वेळीप पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title: In Goa, a Delhi youth was caught with marijuana