अडीच महिन्यातच गोव्यात मान्सूनची लक्ष्यपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 05:41 PM2019-08-15T17:41:49+5:302019-08-15T17:48:05+5:30

सरासरी ११७ इंच पार, अनेक दशकांचा विक्रम

Goa completes its monsoon target in two and a half months | अडीच महिन्यातच गोव्यात मान्सूनची लक्ष्यपूर्ती

अडीच महिन्यातच गोव्यात मान्सूनची लक्ष्यपूर्ती

googlenewsNext

पणजी: नैऋत्य मान्सून गोव्याला सरासरी ११६ इंच एवढा पाऊस देतो, आणि हे लक्ष्य साधारणत: सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होत असते. यंदाच्या मान्सूनने अवघ्या अडीच महिन्यातच गोव्याचा कोटा गोव्याला बहाल करताना राज्यात ११७ इंचांहून अधिक पाऊस पाडला. 


गोव्यात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सरासरी ११६ इंच पाऊस पडतो. ऑगस्टच्या पूर्वार्धापर्यंत पावसाचे सामान्य प्रमाण आहे ९५ इंच एवढे. हे सर्व प्रमाण व अंदाज फोल ठरविणारा पाऊस यंदा गोव्याला मिळाला आहे. यंदा १५ ऑगस्टपर्यंत २१ टक्के अधिक पाऊस पडून ११७ इंच एवढा सरासरी पाऊस नोंद झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत इंचांचे दीड शतकही पूर्ण झाले तर ते आश्चर्य ठरणार नाही. कारण गोव्याच्या सत्तरी तालुक्यात पावसाने इंचांचे दीडशतक केव्हाच पूर्ण केले आहे तर सांगे तालुकाही त्याच मार्गावर आहे.


मान्सून गोव्यात १६ दिवस उशिरा दाखल होवूनही राज्याला भरपूर पाऊस दिला. जून महिन्यात ३० इंच, जुलैमध्ये ५१ इंच तर ऑगस्टच्या अर्ध्या महिन्यातच ३५ इंच एवढा पाऊस झाला आहे, तर अर्धा महिना अजून बाकी आहे. 


्रुंगोव्यात २३ जुन रोजी मान्सून दाखल झाल्यापासून पाऊस पडला नाही असा एकही दिवस गेला नाही. १५ ऑगस्टपर्यंतच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजे ६ इंच पाऊस पडला तर १८ जुलै पर्यंतच्या २४ तासात सर्वात कमी म्हणजे ५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला.  
गोव्यात सरासरी पावसाचे लक्ष्य कधी कधी ओलांडलेही जाते तर कधी कधी तुटीचा मान्सूनही मिळतो. परंतु अडीच महिन्यात लक्ष्य ओलांडण्याची घटना अनेक वर्षांतून पहिल्यांदाच घडत आहे. नेमके किती वर्षांचा विक्रम याची माहिती  हवामान खात्यालाही मागील नोंदी तपासून पाहाव्या लागतील अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. 

२४ तासात सर्वाधिक पाऊस पडलेले दिवस
२९ जून    ४.३ इंच
०३ जुलै    ४.७ इंच
०५ ऑगस्ट    ५.५ इंच
१५ ऑगस्ट    ५.७ इंच

Web Title: Goa completes its monsoon target in two and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस