शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यास गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:49 IST

दुबईत आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनाच्या समारोप समारंभास उपस्थित राहून संबोधले. वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन व सायन्स इंडिया फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय दूतावासाचे अधिकारी, तसेच विविध देशांतील आयुषतज्ज्ञ उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'आयुष क्षेत्रात संशोधन, सहकार्य आणि वेलनेस इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे. आयुष उपचारांचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एकात्मिक आरोग्य व्यवस्थेला जागतिक स्तरावर पुढे नेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. 

पारंपरिक वैद्यक पद्धती ही केवळ सांस्कृतिक वारसा नसून वैज्ञानिक पुराव्यावर आधारित, प्रतिबंधात्मक, परवडणारी आणि सर्वांगीण आरोग्यसेवेचा प्रभावी मार्ग असल्याचे याप्रसंगी अधोरेखित करण्यात आले. जागतिक तज्ज्ञांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आयुष पद्धर्तीच्या आंतरराष्ट्रीय स्वीकाराला अधिक बळ मिळाल्याचे मत परिषदेत व्यक्त करण्यात आले. जागतिक स्तरावरील आयुषतज्ज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Committed to Strengthening Wellness Ecosystem: CM Pramod Sawant

Web Summary : Goa is dedicated to bolstering its wellness ecosystem and promoting Ayush treatments to attract global tourists. Chief Minister Sawant highlighted India's leadership in integrated healthcare under Prime Minister Modi at the International Ayush Conference in Dubai. The conference emphasized Ayush's scientific basis and global acceptance, drawing experts worldwide.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सDubaiदुबई