शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

तेलगोळ्यांमुळे गोव्याची किनारपट्टी काळवंडली!

By admin | Updated: June 8, 2015 01:12 IST

गोवा किनारपट्टीला सतावणारे तेल तवंग अर्थात तेलगोळे पुन्हा एकदा दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर दिसू लागले आहेत.

सुशांत कुंकळयेकर, मडगाव गोवा किनारपट्टीला सतावणारे तेल तवंग अर्थात तेलगोळे पुन्हा एकदा दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर दिसू लागले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. पावसापूर्वी गोव्यात शेवटचा पर्यटन हंगाम संपत असताना तेलगोळ््यांनी समुद्रकिनारे व्यापल्याने पर्यटकांनीही किनाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे.दक्षिण गोव्यात वार्का व मोबोर या दोन किनाऱ्यांवर ३ आणि ४ जूनला तेलाचे गोळे आले होते. याच पट्ट्यात तब्बल सात तारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे हॉटेल्समधील पर्यटकांना किनाऱ्यावर जाणे अडचणीचे झाले आहे. गोव्यात दरवर्षी पावसाळ््यात किनाऱ्यावर तेलगोळे येतात. मागील वर्षी त्यामुळे उत्तर गोव्याची किनारपट्टी काळवंडली होती. संसदेतही हा प्रश्न गाजला होता. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी तेलगोळ््यांची राष्ट्रीय पातळीवर चाचणी घेतली जाईल, असे सांगितले होते.तेल गोळ््याच्या समस्येवर सध्या पर्यावरण क्षेत्रातील ‘टेरी’ व समुद्र विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ‘एनआयओ’च्या शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले आहे. तेल गोळ््यांचे नमुने या दोन्ही संस्थांच्या शास्त्रज्ञांनी जमा केल्याची माहिती गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नोरोन्हा यांनी दिली. गोव्यातील ‘एनआयओ’ने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहाय्याने तीन कोटी आठ लाख खर्चून संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारली आहे. किनारे स्वच्छ ठेवण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे.-------गोव्यात दरवर्षी समुद्रकिनाऱ्यावर तेलगोळे येतात. समुद्रात जहाजातून तेलाची गळती होते, त्यामुळे ही समस्या निर्माण होते. पावसाळ््यापूर्वी हा तवंग पाण्यावर पसरतो आणि त्यात वाळू मिसळल्याने त्याचे गोळे होतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखडाही तयार केला आहे.- जुझे मान्युएल नोरोन्हा अध्यक्ष, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ