पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सावंत यांच्या बाजूनं 20 आमदारांनी मतदान केलं. तर 15 जण त्यांच्या विरोधात गेले. त्यामुळे सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्र गोमांतक, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी साथ दिल्यानं सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:27 IST