शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 11:47 IST

गोवा मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या मोहन रानडे यांचं 90 व्या वर्षी निधन

पणजी : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे जीवन आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी होते व आहे, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रानडे यांच्याविषयी आपल्या भावना मंगळवारी सकाळी व्यक्त केल्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात रानडे यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. काही महिन्यांपासून त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरू होता. तसेच त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनदेखील कमी झाले होते. रानडे यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर लगेच मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'गोवा मुक्ती लढ्यात रानडे यांनी खूपच मोठे योगदान दिले. गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप त्रास सहन केला. हालअपेष्टा भोगल्या,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी रानडे यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोवा व पोर्तुगालच्या तुरुंगात रानडे यांनी चौदा वर्षे घालवली. रानडे यांचा त्याग आणि संघर्ष गोवा राज्य कधीच विसरणार नाही. रानडे यांनी आपले पूर्ण जीवन समाजाच्या सेवेसाठी दिले. रानडे यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.'गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनीही रानडे यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. रानडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले. ओम शांती, असे वेलिंगकर म्हणाले. सोशल मीडियावरून अनेकांनी रानडे यांना श्रद्धांजली वाहिली. रानडे यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीरांमुळेच आम्हा गोमंतकीयांना स्वातंत्र्य मिळाले, अशा शब्दांत अनेक गोमंतकीयांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.रानडे यांच्या निधनाने झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही. रानडे यांच्यावर कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला माहितीपट लवकरच सर्व शाळांमध्ये दाखवून नव्या पिढीपर्यंत रानडे यांचे योगदान पोहचवले जाईल, असे गोव्याचे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही श्रद्धांजली वाहिली. रानडे यांचे गोवा मुक्ती लढ्यातील योगदान अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. मला त्यांच्या निधनाचे दु:ख ऐकून खूप वाईट वाटले, असे कामत म्हणाले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा