शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

चिंबल आयटी पार्कबाबत महिनाअखेरीस श्वेतपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 6:38 PM

चिंबल येथील नियोजित आयटी पार्कबाबत या महिन्याच्या अखेरीस सरकारकडून श्वेतपत्रिका व सविस्तर योजना जाहीर केली जाईल, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी येथे जाहीर केले.

पणजी : चिंबल येथील नियोजित आयटी पार्कबाबत या महिन्याच्या अखेरीस सरकारकडून श्वेतपत्रिका व सविस्तर योजना जाहीर केली जाईल, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी येथे जाहीर केले. काहीजण चिंबलमध्ये आयटी पार्क नको, अशी भूमिका घेत असले तरी, स्थानिक ग्रामपंचायतीने तशी भूमिका घेतलेली नाही.

तसेच सरकारनेही आयटी पार्क उभे करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री खंवटे यांनी सांगितले, की, आयटी पार्कमुळे मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल व स्थानिकांना त्या रोजगार संधींचा लाभ मिळेल. लोकांमध्ये शंका राहू नये म्हणून आयटी पार्कविषयी सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका व एकूण योजना आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत. या महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकांसमोर योजना मांडली जाईल. 

आयटी पार्कचा व चिंबलच्या तळ्य़ाचा परस्पराशी काही संबंध येत नाही. तळे खूप दूर आहे, असे मंत्री खंवटे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटीचेही काम सरकार पुढे नेत आहे. पर्वरी, मोरजी व अन्य काही ठिकाणीही आयटीविषयक उपक्रम सुरू करण्याचा संकल्प सरकारने सोडलेला आहे. चिंबल येथे नुकतीच ग्रामसभा पार पडली. त्यावेळी ग्रामस्थांमध्ये दोन गट दिसून आले. चिंबलवर आयटी पार्क लादले जाऊ नये अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली व चिंबलचे तळे तसेच तेथील मोठी जमीन धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली. दुस:याबाजूने चिंबलच्या सरपंचानी मात्र आयटी पार्कला पाठींबा देणारा ठराव ग्रामसभेत संमत झाल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात ठराव संमत झालेला नाही, असा दावा दुस-या दिवशी ग्रामस्थांच्या एका संघटनेने पत्रकार परिषद घेऊन केला व सखोल चौकशीची मागणी केली.