चेहरा वडिलासारखा दिसणे हाच चिन्मयचा गुन्हा ठरला, हत्येचा आरोप असणाऱ्या आईने केलं कबूल
By वासुदेव.पागी | Updated: January 11, 2024 17:11 IST2024-01-11T17:03:29+5:302024-01-11T17:11:24+5:30
गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सुचना सेठने तिच्या कुटुंबियांना सांगितले की तिच्या मुलाचा चेहरा तिचा विभक्त पतीसारखा आहे.

चेहरा वडिलासारखा दिसणे हाच चिन्मयचा गुन्हा ठरला, हत्येचा आरोप असणाऱ्या आईने केलं कबूल
पणजी: सूचना सेठचा मुलगा चिन्मय आणि तिचा विभक्त पती व्यंकट रमण यांच्या चेहऱ्यात खूप साम्य होते. त्यामुळे मुलाला पाहताच सूचनाला रमणची आठवण व्हायची, आणि तिच्या विस्कटलेल्या संबंधाची आठवण व्हायची असे सूचना आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगत होती. त्यामुळे मुलाच्या खुनाचे हेही एक कारण असू शकते असा निष्कर्ष ही पोलीस काढत आहेत.
गोव्यात आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सुचना सेठने तिच्या कुटुंबियांना सांगितले की तिच्या मुलाचा चेहरा तिचा विभक्त पतीसारखा आहे. सूचनाला पती बद्दल खूप तिटकारा होता. चिन्मयची कस्टडी न्यायालयाने सूचनाला दिली होती आणि आठवड्यातून केवळ एकदा भेटण्याची परवानगी रमणला देणे तिला पचनी पडत नव्हते. चिन्मयचा रमणशी काहीच संबंध ठेवण्यास ती राजी नव्हती. त्यामुळेच जेव्हा रमणने रात्री तिला व्हिडिओ कॉल केला त्यावेळी चिन्मय झोपल्याचे तिने रमणला सांगितले होते. तसेच चिन्मय बोलू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर उशी ठेवून दाब दिला होता आणि त्यातच चिन्मयचा मृत्यू झाला होता.
दरम्यान कळंगुट पोलिसांनी गुरुवारी सूचना याची कसून चौकशी केली. मात्र ती आपण चिन्मयचा खून केल्याचे अजूनही कबूल करत नाही.