Goa: गोव्यात भू सर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, संशयित फरार
By सूरज.नाईकपवार | Updated: March 18, 2024 21:01 IST2024-03-18T21:01:24+5:302024-03-18T21:01:45+5:30
Goa News: गोव्यातील मडगावातील माथानी संकुलात असलेल्या भूसर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहाण करण्याची खळबळजन घटना आज सोमवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर कार्यालयातील अन्य कर्मचारीही भयभित झाले.

Goa: गोव्यात भू सर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहण, संशयित फरार
- सूरज नाईकपवार
मडगाव - गोव्यातील मडगावातील माथानी संकुलात असलेल्या भूसर्वेक्षण कार्यालयात मुख्य सर्व्हेक्षकाला मारहाण करण्याची खळबळजन घटना आज सोमवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर कार्यालयातील अन्य कर्मचारीही भयभित झाले. नंतर हल्लेखोराने घटनास्थळाहून पळ काढला. या प्रकरणी सदया अज्ञातावर फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पोलिस त्याच्या मागावर असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधिक्षक सुनिता सावंत यांनी दिली.
या मारहाणीत मुख्य सर्व्हेक्षक प्रसाद सावंत देसाई हे जखमी झाले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मारहाणीची वरील घटना घडली. एक साधारणता ३५ ते ४० वयोगटातील धडधाकट इसम या कार्यालयात आला होता. आपल्या जमिनीच्या फाईलबाबत तो विचारणा करीत होता. आपली फाईल तुम्ही या देत नाही असे विचारत तो संतप्त झाला, त्याच्या हातात यावेळी हॅल्मेट होते. त्या हॅल्मेटने त्याने देसाई यांना मारहाण केली.
आक्समीत झालेल्या या घटनेमुळे कार्यालयातील अन्य कर्मचारी व लोकही भयभीत झाले. सुरक्षा रक्षकाने त्या हल्लेखोराचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र तो निसटला. पाठीमागे सुरक्षा रक्षक लागल्याने त्याने दुचाकी न घेता पळ काढला. जखमी प्रसाद यांना नंतर उपचारासाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. फातोर्डा पोलिसांनी भादंसंच्०या ३५३,३२४,५०४ व ५०६ (२) कलमाखाली सदया अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक अमिन नाईक पुढील तपास करीत आहेत.