गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 06:51 IST2018-02-26T02:42:16+5:302018-02-26T06:51:49+5:30

मनोहर पर्रीकर यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रविवारी रात्री ८.३० वाजता त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करावे लागले.

Goa Chief Minister Manohar Parrikar again in hospital | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रविवारी रात्री ८.३० वाजता त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करावे लागले. मुंबई येथील लीलावती इस्पितळात स्वादुपिंडाच्या आजारावर त्यांच्यावर उपचार झाले.
पर्रीकर यांना रविवारी रात्री ८ वाजता अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना तातडीने गोमेकॉत न्यावे लागले. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. पर्रीकर आजाराच्या काळातही सरकारी कारभार पाहत असल्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या घरीच फाइल्स जात आहेत. घरीच ते फाइल्स पाहत आहेत. अनेक फाइल्स त्यांच्याकडे पाठविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Web Title: Goa Chief Minister Manohar Parrikar again in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.