Goa Cabinet decision to reduce road tax for new vehicles by 50% | नव्या वाहनांसाठी रोड टॅक्समध्ये 50 टक्के कपात, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नव्या वाहनांसाठी रोड टॅक्समध्ये 50 टक्के कपात, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 पणजी - गोव्यात येत्या दि. 31 डिसेंबर्पयत ज्या नव्या वाहनांची नोंदणी केली जाईल, त्या वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ असेल. म्हणजेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फक्त 50 टक्के रस्ता कर लागू होणार आहे. गोवा मंत्रिमंडळाने बुधवारी याबाबतचा प्रस्ताव मंजुर केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथील मंत्रलयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी बैठकीतील निर्णयांविषयी माहिती दिली. पुढील अडिच-तीन महिन्यांत डिसेंबर्पयत जी वाहन खरेदी व नोंदणी होणार आहे, त्यांना 1क्क् टक्के रस्ता कर भरावा लागणार नाही. देशभरच ऑटोमोबाईल क्षेत्रत मंदी आलेली आहे. वाहन खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे आम्ही वाहनांसाठी रस्ता करात सवलत देणार असल्याचे विधान गेल्या आठवडय़ात राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले होते. या प्रस्तावाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यापूर्वी आक्षेप घेतला होता. तथापि, गोवा सरकार ठाम राहिले.

दरम्यान, गोवा नर्सिग संस्थेमधून ज्या बीएसस्सी शिक्षित मुली परिचारिका पदवी घेऊन बाहेर येतात, त्यांनी एक वर्ष गोवा सरकारच्या इस्पितळांमध्ये यापुढे सेवा बजावावीच लागेल. तसा निर्णयही मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. एक वर्ष सेवा बजाविण्यासाठी अशा परिचारिकांकडून लेखी हमी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) बहुतेक परिचारिका काम करतात. तसेच अन्य सरकारी इस्पितळांमध्येही परिचारिकांना सेवेत घेतले जाते.

राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. याविरुद्ध उपाययोजना म्हणून तीन खात्यांमध्ये अधिक समन्वयाची गरज आहे. पंचायती, पालिका, आरोग्य खात्याची यंत्रणा यांच्यात समन्वय वाढायला हवा अशा प्रकारची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे एका मंत्र्याने स्पष्ट केले.


Web Title: Goa Cabinet decision to reduce road tax for new vehicles by 50%
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.