शहरं
Join us  
Trending Stories
1
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
2
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
3
बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
4
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
5
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
6
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
7
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
8
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
9
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
11
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
12
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
13
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
14
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
15
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
16
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
17
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
18
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
19
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
20
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातही राजकीय भूकंप; काँग्रेसच्या ११ पैकी १० आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 11:22 IST

भाजप श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल

पणजी : गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून अकरापैकी दहा आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप श्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून आज सायंकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवार ११ जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली विरोधी काँग्रेसची आमदारांमध्ये गतिमान झाल्या आहेत. शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने दाखल झाले. त्यांनी आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्ष नेते मायकल लोबो तसेच अन्य नऊ काँग्रेसचे आमदार मिळून एकूण दहा जण काँग्रेस विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती मिळते.

भाजपच्या एका स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून विलीनीकरणास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत हे आमदार भाजप प्रवेश करतील. गोवा विधानसभेत सध्या काँग्रेसचे अकरा आमदार आहेत. लोकमतला प्राप्त माहितीनुसार सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस वगळता काँग्रेसचे दहा आमदार माझे प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. पक्षांतर बंदी कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश आमदार फुटीची आवश्यकता आहे. आठ आमदार पुरेसे होते, परंतु येथे ११ पैकी १० आमदार भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत.

जुलै २०१९ ची पुनरावृत्ती  जुलै २०१९ ची पुनरावृत्ती पुन्हा एकदा गोव्यात होणार आहे. २०१९ मध्ये बाबू कवळेकर हे विरोधी पक्ष नेते असताना सोबत नऊ आमदारांना घेऊन भाजपात गेले होते. त्यावेळी काँग्रेसचे १५ आमदार विधानसभेत होते. पंधरापैकी दहा आमदार फुटले होते.

लोबो यांच्यासोबत भाजप प्रवेशाच्या तयारीत दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. भाजप प्रवेशानंतर त्यांना राज्यसभेवर स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोवा फॉरवर्डशी युतीने काँग्रेसने निवडणूक लढवली होती गोवा फॉरवर्डचा एक आमदार विधानसभेत आहे.

या घडामोडीनंतर विधानसभेत विरोधात फॉरवर्डचा एक आमदार, रिव्होल्यूशनरी गोवन्सचा एक आमदार आणि आम आदमी पक्षाचे दोन आमदार एवढेच विरोधक राहतील. सांताक्रुज मतदारसंघाचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस म्हणाले की, मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो आहे. त्यामुळे मतदारांशी प्रतारणा करणार नाही. प्रसंगी एकटाच काँग्रेसमध्ये राहीन, पण पक्ष सोडणार नाही.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा