लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याने आरोग्य क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. रशियातील बायोप्रोम २०२५ परिषदेत गोव्याच्या आरोग्य मॉडेलचे मंत्री विश्वजित राणे यांनी सादरीकरण केले. या परिषदेला रशियाचे विविध मंत्री तसेच ब्रिक्स राष्ट्रांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते.
या सादरीकरणानंतर मंत्री राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, रशियातील बायोप्रोम २०२५ परिषदेत आरोग्यसेवेसाठी गोवा मॉडेल सादर करण्याचे सौभाग्य मला मिळाले. गोवा राज्य भारताचे नेतृत्व कसे करत आहे आणि आरोग्य सेवेमध्ये नावीन्य आणि समानतेसाठी जागतिक मान्यता कशी मिळवत आहे हे दाखवण्याची संधी मला मिळाली. रशियन फेडरेशनच्या उद्योग आणि व्यापार उपमंत्री एकटेरिना प्रिझेवा, रशियन फेडरेशनचे आरोग्य उपमंत्री सर्गेई ग्लागोलेव्ह, ब्रिक्स राष्ट्रांचे आरोग्यमंत्री आणि जगभरातील इतर प्रतिष्ठित कॉर्पोरेट चॅम्पियन्स या परिषदेत सहभागी झालेले आहेत, असेही राणे यांनी सांगितले.
गोवा हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने नावीन्यपूर्ण जीवनरक्षक उपचारांसाठी किंमत धोरण लागू केले आहे. याद्वारे सर्वांसाठी गंभीर आजारांच्या बाबतीत प्रगत उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध केले जातात. कर्करोगाच्या बाबतीत आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
एआयचालित तपासणी, जीवनरक्षक औषधे गरजूंसाठी सुलभआणि मोफत उपलब्ध करते. एनजीएस चाचणी आणि आयब्रेस्ट स्क्रीनिंग यासारख्या उपक्रमांसह आम्ही लोकांना लवकर निदान, वैयक्तिकृत उपचार उपलब्ध करतो, असेही राणे यांनी सांगितले.
जगासाठी आदर्शवत...
मंत्री राणे म्हणाले की, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा प्रत्यक्षात आणणे हे आमचे स्वप्न आहे. 'एक पृथ्वी, एक आरोग्य' या जागतिक संकल्पनेला आम्ही गवसणी घातलेली आहे. गोव्याचे आरोग्यसेवा मॉडेल केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्शवत असून समतापूर्ण, समावेशक आणि नावीन्यपूर्ण आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काय साध्य केले जाऊ शकते याचे एक चमकदार उदाहरण आहे.
काय म्हणाले मंत्री राणे ?
आमच्या नावीन्यपूर्ण आणि जीवनरक्षक उपचारांचे किंमत धोरण तसेच गोवा तिसऱ्या पिढीतील टायरोसिन काइनेज इनहिबिटर औषधे खरेदी करू शकेल. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांबाबत आम्ही क्रांती घडवून आणली आहे. जागतिक स्तरावर, या औषधांची किंमत दरवर्षी ६० हजार डॉलर्सपर्यंत आहे. जी बहुतांश कुटुंबांसाठी अकल्पनीय किंमत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधारे तपासणी केली जात आहे. गोव्यात जवळजवळ ८० हजार स्कॅनिंग केले आहे. ६ हजारांहून अधिक फुफ्फुस नोड्यूल शोधले आहेत. आयब्रेस्ट उपकरणाद्वारे २ लाख स्कॅन केले आहेत. पुढे, आम्ही नेक्स्ट-जनरेशन सिक्वेन्सिंग चाचणी करू, ज्यामुळे प्रत्येक पात्र गोव्याला जीनोमिक प्रोफाइलिंगची सुविधा मिळेल.
राज्यात कर्करोगाचे दरवर्षी सुमारे १,५०० नवीन रुग्ण आढळतात, ही संख्या दरवर्षी ५ ते ६ टक्क्यांनी वाढते. स्तन, तोंड, गर्भाशय आणि फुफ्फुस यांसारखे कर्करोग केवळ आरोग्याला धोका निर्माण करत नाहीत तर कुटुंबाची आर्थिक परीक्षा घेतात. गोव्याच्या कर्करोग नोंदणीने महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण विशेषतः उच्च असल्याचे नोंदवले आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
Web Summary : Goa showcased its healthcare model at Russia's Bioprom 2025. Minister Rane highlighted Goa's innovative approach, including affordable life-saving treatments and AI-powered screenings for early cancer detection. Goa pioneers affordable, accessible healthcare, setting a global example with focus on cancer care and advanced diagnostics.
Web Summary : गोवा ने रूस के बायोप्रोम 2025 में अपने स्वास्थ्य सेवा मॉडल का प्रदर्शन किया। मंत्री राणे ने किफायती जीवन रक्षक उपचार और कैंसर का शीघ्र पता लगाने के लिए एआई-संचालित स्क्रीनिंग सहित गोवा के नवीन दृष्टिकोण पर प्रकाश डाला। गोवा सस्ती, सुलभ स्वास्थ्य सेवा में अग्रणी है।