गोवा : दुचाकीस्वाराला धडक वाचविण्याच्या प्रयत्नात विचित्र अपघात, कार उलटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:28 IST2024-02-11T16:28:31+5:302024-02-11T16:28:47+5:30
पर्वरी महामार्गावर ‘मॉल दि गोवा’ समोर या आठवडाभरात दुसऱ्यांदा अपघात झाला.

गोवा : दुचाकीस्वाराला धडक वाचविण्याच्या प्रयत्नात विचित्र अपघात, कार उलटली
पर्वरी : पर्वरी महामार्गावर ‘मॉल दि गोवा’ समोर या आठवडाभरात दुसऱ्यांदा अपघात झाला. रविवारी (दि. ११) तीन वाहनांच्या विचित्र अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात ही स्वीफ्ट डिझायर कार उलटली.
पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी (दि.११) सकाळी स्वीफ्ट डिझायर पर्यटक कार (जीए-०६, टी-८०२२) एका दुचाकीस्वाराला बसणारी धडक वाचवण्यासाठी थांबण्याच्या प्रयत्नात उलटण्याचा प्रकार घडला. पाठीमागून आलेल्या स्कोडा कारने (जीए-०७,के-८७९२) अचानक ओव्हरटेक केले. त्यामुळे स्वीफ्ट कारचालाकाने ब्रेक लावला. त्यावेळी कारने पुढे असलेल्या होंडा मोटारसायकल (जीए-०३,एडी-८११०) ला निसटती धडक दिली. ही धडक चुकवण्याच्या प्रयत्नात कार उलटली. या विचित्र अपघातात डिझायर कार आणि मोटारसायकलचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हवालदार सुभाष गावस यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, पर्वरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढीस लागले असून दर आठवड्याला एक ते दोन अपघात होत आहेत.