शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Elections 2022 Result: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पीछाडीवर; दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 10:50 IST

साखळीत यावेळी ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. राज्यातील हे सर्वाधिक मतदान होते.

 

पणजी : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत मतमोजणीच्या दुसºया फेरीअंती काँग्रेशचे धर्मेश सगलानी यांच्यापेक्षा ४१७ मतांनी पीछाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक निकाल काही तासातच अपेक्षित आहेत. चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर व मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत आहेत. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे.

साखळीत यावेळी ८९.६४ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. राज्यातील हे सर्वाधिक मतदान होते. हा कौल प्रस्थापिताविरुध्द असल्याचा तसेच मतदारसंघातील लोकांनी सावंत यांच्या विरोधात असल्याचा दावा केला जात होता. केंद्रात भाजपचे सरकार असूनही सावंत हे राज्यात बंद असलेला खाण व्यवसाय सुरु करु शकले नाहीत. तसेच नोकऱ्याही देऊ शकले नाहीत याबद्दल चीड होती.

कवळेकर हे केपें मतदारसंघातून तर आजगांवकर हे मडगांव मतदारसंघातून रिंगणात आहेत. २0१९ साली कवळेकर हे काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये तर आजगांवकर हे मगोपमधून भाजपमध्ये गेले होते. आजगांवकर हे एरव्ही पेडणे मतदारसंघातून निवडणूक लढवत असत. परंतु यावेळी भाजपने त्यांना पेडणेंत तिकीट नाकारली आणि मडगांवमध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याशी टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरविले. परंतु हा बदल आजगांवकर यांना महागात पडला.सध्याची आघाडीभाजप   १८काँग्रेस  १२मगोप-तृणमूल   ५अपक्ष    ३इतर   २एकूण जागा  ४0 

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपा