शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Goa Assembly Election 2022: "शिवसेनेकडे ओरिजनल 'आम आदमी'; साफ करण्यासाठी एका हाती झाडू, दुसऱ्या हाती धनुष्यबाण"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:39 IST

उत्पल पर्रिकरांचं योगदान काय, यापेक्षा गोव्यात जे ग्रेट गँबलर्स आणि ठग्स ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढवू इच्छिता का?, राऊत यांचा सवाल.

Goa Assembly Election 2022 : निवडणूक आयोगानं (Election Commission) आगामी विधानसभेच्या निवडणुकांची (Assembly Elections) घोषणा केल्यानंतर सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस हा पक्षही उतरल्यानं त्याचा फटका काँग्रेसला बसेल का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, गोवा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची (Shiv Sena) भूमिका काय याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. सध्या शिवसेनेची १० जणांची यादी तयार आहे. परंतु अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या ठिकाणी आल्यावर आम्ही चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ असं ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. आदित्य ठाकरे यांनीदेखील एक टीम यासाठी पाठवली आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर मुंबईतील प्रमुख लोक या ठिकाणी येऊन काम करतील आणि मार्गदर्शनही करतील. निवडणुकीला पुढे घेऊन जातील, असंही राऊत म्हणाले. टीव्ही ९ ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "तृणमूल काँग्रेसचे इकडचं काम पाहणारे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. सर्वांनी एकत्र यावं ही आमची इच्छा आहे. पण यात त्याग कोणी करायला तयार नसतं. प्रत्येकाला दुसऱ्यानं त्याग करावं असं वाटतं. या सगळ्या वादात पडू नये असं ठरवलं आहे. आम्ही ज्या काही जागा लढवतोय त्यापैकी काही जागांवर अधिक लक्ष देऊ," असंही ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल एकत्र येण्याची वेळ निघून गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

"शिवसेनेमधून लढणारे सर्वच आम आदमी आहेत. आमच्याकडे ओरिजनल आम आदमी आहेत. साफ करण्यासाठी आमच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात धनुष्यबाणही आहे," असं राऊत आम आदमी पक्षाबद्दल बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी उत्पल पर्रिकर यांच्याबाबत भाजपनं घेतलेल्या भूमिकेवरही मत व्यक्त केलं. 

गोवा ही देवभूमी"गोवा ही देवभूमी आहे. त्यांच्या तोंडी कायमच नैतिकतेचं भजन असतं. आज भाजपकडे जे गोव्यात उमेदवार आहेत, त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे, माफियागिरीचे आरोप आहेत. काही ठिकाणी त्यांनी अफू, चरस गांजाचा व्यापार करणाऱ्या लोकांना पक्षात घेतलंय. त्यामुळे उत्पल पर्रिकरांचं योगदान काय यापेक्षा गोव्यात जे ग्रेट गँबलर्स आणि ठग्स ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढवू इच्छिता का?," असाही सवालही त्यांनी केलं. फडणवीसांचं गोव्यात येऊन अध:पतन झालं आहे, फडणवीसांकडून अशी अपेक्षा नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतGoa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२AAPआपcongressकाँग्रेस