Goa Assembly Election 2022 : 'या राज्याचे नाव आहे गोवा, लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा'; आठवलेंचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:53 IST2022-02-09T18:52:38+5:302022-02-09T18:53:01+5:30
१४ फेब्रुवारीला गोव्यात एका टप्प्यात पार पडणारे मतदान.

Goa Assembly Election 2022 : 'या राज्याचे नाव आहे गोवा, लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा'; आठवलेंचा काँग्रेसला टोला
काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी केवळ जाहीरनामा प्रसिद्ध केला नसून ते २०३५ पर्यंत गोव्यासाठीचे ध्येय आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत येताच दर सहा महिन्यांनी या जाहीरनाम्यातील आश्वासांची पूर्तता होत आहे का याचा आढावा घेतला जाईल, असे जाहीरनामा समितीचे प्रमुख ॲड. रमाकांत खलप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच जनता काँग्रेसकडे पर्याय म्हणून पहात आहेत. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत किमान २४ ते २६ जिंकणार असा विश्वास असल्याचंही मत प्रदेशाध्यत्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केलं होतं. परंतु काँग्रेसकडून होत असलेल्या दाव्यांवर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काव्यात्मक शैलीत टोला लगावला आहे.
"या राज्याचे नाव आहे गोवा. लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा. येथे घडणार आहे इतिहास नवा, काँग्रेसचा चालणार नाही दावा," असं म्हणत आठवले यांनी काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे.
या राज्याचे नाव आहे गोवा
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 9, 2022
लोक म्हणतात प्रमोद सावंतच मुख्यमंत्री हवा
येथे घडणार आहे इतिहास नवा
काँग्रेसचा चालणार नाही दावा
"जनता काँग्रेसकडे पर्याय म्हणून पहात आहेत. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत किमान २४ ते २६ जिंकणार असा विश्वास आहे. पक्षाने निवडणुकीत ३७ उमेदवार उभे केले असून, त्यापैकी ३१ चेहरे हे नवे आहेत. भाजपविरोधी मते फुटणार नाही याची खात्री असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले होते.