Goa: रविवारच्या मीससाठी जात असताना गोव्यातील एका १९ वर्षीय युवतीचे अपहरण
By सूरज.नाईकपवार | Updated: July 16, 2023 16:23 IST2023-07-16T16:23:15+5:302023-07-16T16:23:32+5:30
Goa: आज रविवारी सकाळी चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जात असताना एका १९ वर्षीय युवतीचे अपहरण हाेण्याची घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील सासष्टीत तालुक्यातील ओर्ली येथे घडली.

Goa: रविवारच्या मीससाठी जात असताना गोव्यातील एका १९ वर्षीय युवतीचे अपहरण
- सूरज नाईक पवार
मडगाव - आज रविवारी सकाळी चर्च मध्ये प्रार्थनेसाठी जात असताना एका १९ वर्षीय युवतीचे अपहरण हाेण्याची घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील सासष्टीत तालुक्यातील ओर्ली येथे घडली. या घटनेनंतर या भागात खळबळ उडाली. कोलवा पाेलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ती मुलगी कर्नाटकातील कारवार जिल्हयातील दांडेली येथे असल्याचे पोलिसांना मोबाईल लोककेशनवर माहिती मिळाली आहे. पोलिसांनी पोलिसांचे एक पथक तेथे पाठवून दिले आहे. हे प्रकरण भादंंसंच्या ३६३ कलमाखाली अपहरण म्हणून पोलिसांनी नोंद केल्याची माहिती कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांनी दिली.
त्या युवतीने व्हॉईस मेसेजवर आपण अमुक ठिकाणी पाेहचल्याची माहिती पोलिसांनी दिली. नंतर तिचा मोबाईल स्वीच ऑफ मिळाला अशी माहितीही पोलिसांनी दिली. पुढील पोलिस तपास चालू आहे.