शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातही आता घर वापसी!

By admin | Updated: February 28, 2015 02:02 IST

पणजी : विश्व हिंदू परिषदेचे गोमंतकातही ‘घर वापसी’चे ध्येय आहे. गोव्यात पार्तुगिजांद्वारे हिंदू समाजातील लोकांचे धर्मांतर झाले होते.

पणजी : विश्व हिंदू परिषदेचे गोमंतकातही ‘घर वापसी’चे ध्येय आहे. गोव्यात पार्तुगिजांद्वारे हिंदू समाजातील लोकांचे धर्मांतर झाले होते. धर्मांतरामुळे ख्रिस्ती बनलेल्या लोकांना जर पुन्हा हिंदू धर्मात स्वेच्छेने यायचे असेल तर विश्व हिंदू परिषदेतर्फे दारे खुली करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सत्संग विभागाचे केंद्रीय मंत्री दादा वेदक यांनी पत्रकार परिषदेत केले. वेदक पुढे म्हणाले, कोणत्याही धर्मातील व्यक्तीला हिंदू धर्मात आणण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. मात्र, स्वेच्छेने येणाऱ्या व्यक्तीला हिंदू शास्त्राप्रमाणे समाजात सामावून घेतले जाईल. परिषदेचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास धेंपे म्हणाले, वेदक यांच्या विधानावर मी कोणताही प्रतिसाद देणार नाही. विश्व हिंदू परिषदेतर्फे मडगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विराट हिंदू संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून काम पाहण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे आणि मी ती निभावणार आहे. मी स्वत: विश्व हिंदू परिषदेचा सदस्यही नसल्याचे धेंपो यांनी या वेळी सांगितले. दादा वेदक म्हणाले, सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त मडगाव येथील फातोर्डा मैदानावर १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता विराट हिंदू संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी कणेरीमठ-कोल्हापूर येथील प.पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, पुष्पराज स्वामी, मुकुंदबुवा मडगावकर, बाळमहाराज, पूज्य स्वामी विज्ञानंद, ह.भ.प. मंगलाताई कांबळे, अशोकराव चौगुले, अ‍ॅड. दीपक गायकवाड, सुभाष वेलिंगकर उपस्थित असतील, असे वेदक यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेची स्थापना १९६४ साली झाली होती. या पन्नास वर्षांत परिषदेतर्फे कोणते कार्य करण्यात आले आणि यापुढे कोणते कार्य केले जाईल याचा आढावा या परिषदेत घेण्यात येणार आहे. गोमंतकात हिंदू धर्माप्रती सकारात्मक वातावरण आहे. येथे धार्मिक कार्य, संस्कार, संस्कृती यांची चांगल्या पद्धतीने जोपासना होत आहे. देवालयांच्या समित्यांशी विश्व हिंदू परिषदेतर्फे संपर्क साधून बाल संस्कार केंद्रे, गोरक्षण केंद्रे, प्रवचने, कीर्तने यांचे वारंवार आयोजन व्हावे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही वेदक म्हणाले. (प्रतिनिधी)