लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात १४ वर्षे भाजपचे सरकार आहे. डबल इंजिनचा नारा देणाऱ्या भाजपकडे नगरपालिका, पंचायती, अशी अनेक इंजिने आहेत. तरीही त्यांनी गोव्याला अधोगतीकडे नेले. गोमंतकीयांनी भाजपपूर्वी इतर पक्षांनाही संधी देऊन पाहिली.
प्रत्येक पक्ष अपेक्षांना फोल ठरला आहे. आम्हाला फक्त एकच संधी द्या, गोव्यात परिवर्तन घडवून आणू, असे आश्वासन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिले. फोंडा पोटनिवडणुकीत आपचे उमेदवार गीतेश नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केजरीवाल बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे राज्य संयोजक वाल्मिकी नायक, आमदार वेंझी व्हिएगस, आमदार क्रूज सिल्वा आदी उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले की, पूर्वी भाजपचे सरकार निवडणुका जवळ आल्या की काम करण्याचे नाटक करायचे.
परंतु आता निवडणुका जवळ आल्या तरीही हे सरकार काम करत नाही. लोकांना दूषित पाणी देण्यात येते, संपूर्ण गोव्याची कचरा कुंडी करून ठेवली आहे. हे सरकार मतदारांना गृहीत धरते. सरकारने फोंड्याला नेमके काय दिले, याचा अहवाल द्यावा. (वा. प्र)
'सरकार आल्यास वीज बील शून्य करू'
दिल्ली व पंजाबमध्ये आम्ही वीज मोफत देऊन आदर्श निर्माण केला. गरीब जनतेला दिलासा दिला. या उलट गोव्यात वीजपुरवठा सुरळीत नसताना बिले भरमसाट येत आहेत. गोव्यात आमचे सरकार आल्यानंतर एका वर्षाच्या संपूर्ण राज्यात 'झिरो बिल' योजना अमलात आणू, गोव्यातील आपचे दोन आमदार सध्या आपल्या पगारातून जनसेवा करत आहेत. तर सरकार लोकांचा पैसा लुटण्याचे काम करते. आरोपीला शिक्षा देण्याचे सोडून नगरसेवकाच्या मुलाला पाठीशी घालण्याचे काम केले जाते. हा पीडित मुलींच्या कुटुंबीयांवर अन्याय आहे.
सहा महिन्यांत प्रमुख समस्या सोडवू : वाल्मिकी नायक
वाल्मिकी नायक म्हणाले की, भाजपने मागील चार वर्षांत काहीच काम केले नाही, ते उर्वरित एका वर्षात काय काम करणार ? काँग्रेस म्हणणार, आम्ही विरोधात आहोत, आम्ही काही करू शकणार नाही. पण आम्ही सहा महिन्यांत फोंड्याचे सहा प्रमुख मुद्दे सोडवून दाखवू, अपयशी ठरलो तर २०२७ च्या निवडणुकीत आम्हाला उभे करून घेऊ नका.
उमेदवार गीतेश नाईक म्हणाले, की भाजप १ सहानुभूतीवर मते मागत आहे. एकाच कुटुंबाला फोंड्याची राजेशाही बहाल करण्याचे काम आजपर्यंत लोकांनी केले. हे आता बदलून टाकूया.
आमदार व्हिएगस म्हणाले, की सर्व हिंदू भाजपला मते देतात, हा संभ्रम आता दूर करण्याची वेळ आली आहे. मतदान करताना विकासाला प्राधान्य द्या.
गीतेश नाईक निवडून येताच, प्रत्येक प्रभागात मोफत दवाखाने सुरू करू, त्यात गीतेश अपयशी ठरले तर मी बाणावलीतून पुढील निवडणूक लढवणार नाही.
आमदार सिल्वा म्हणाले, की आमचा पक्ष नेहमी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढत आलेला आहे. जे वचन देतो, ते आम्ही पूर्ण करतो. फोंड्यात बदल गरजेचा आहे.
Web Summary : Arvind Kejriwal promised change in Goa if AAP gets one chance. He criticized BJP's governance and highlighted AAP's work in Delhi and Punjab, like free electricity. He promised zero electricity bills in Goa. Other AAP leaders emphasized solving Ponda's issues within six months.
Web Summary : अरविंद केजरीवाल ने गोवा में आप को एक मौका मिलने पर बदलाव का वादा किया। उन्होंने भाजपा के शासन की आलोचना की और दिल्ली और पंजाब में आप के मुफ्त बिजली जैसे कार्यों पर प्रकाश डाला। उन्होंने गोवा में शून्य बिजली बिल का वादा किया। अन्य आप नेताओं ने छह महीने के भीतर पोंडा के मुद्दों को हल करने पर जोर दिया।