शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पुरावे द्या, मगच आरोप करा; भाजपने विरोधकांना सुनावले, कारवाईचा दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 11:05 IST

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या विक्री घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केल्याचा आरोप भाजपच्या तीन आमदारांनी काल केला. आधी पुरावे द्या, मगच बोला असा थेट इशारा देत असेच आरोप चालूच ठेवल्यास विरोधकांवर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार करू, असा थेट इशारा सोमवारी भापजचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, आमदार केदार नाईक उपस्थित होते. आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, हरयाणा व महाराष्ट्रातील पराभवाने विरोधक वैफल्यग्रस्त बनले आहेत. नोकऱ्या विक्रीच्या बाबतीत वैयक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. कोणताही पुरावा नसताना वैयक्तिक चारित्र्यहनन सुरू आहे. काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दिल्लीला जाऊन पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या, कारण गोव्यात त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, फातोर्डा ते लंडन १३० कोटी रुपयांचा घोटाळ्याबद्दल विरोधक बोलत नाहीत. एका विरोधी आमदाराचे असे म्हणणे आहे की, लोकांचे पैसे परत केले. परंतु, त्याने प्रश्न संपला असे होत नाही. फसवणूक झालेली आहे. आमदाराच्या सेक्स्टॉर्शनच्या बाबतीतही विरोधक गप्प आहेत. हे खंडणी प्रकरण की सेक्स स्कॅण्डल हा मोठा प्रश्न आहे. कार्ल्स यांनी स्वतः याबद्दल पुढे येऊन बोलायला हवे; परंतु ते कुठे लपले आहेत, याचा पत्ता नाही.

कार्लस यांनी वरील प्रकरणात जनतेसमोर येऊन काय ते स्पष्ट करायला हवे. हे खंडणी प्रकरण? सेक्स स्कॅण्डल की नातेसंबंध हे उघड व्हायला हवे. कार्लस यांना कोणी फसवलेले नाही. त्यांनी स्वतःच तक्रार दिली आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असेही वेर्णेकर म्हणाले.

... म्हणून दिल्लीत जाऊन ते बोलले!

फळदेसाई म्हणाले की, आपचे केंद्रीय नेते संजय सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आरोप केले; परंतु कोणतेच पुरावे दिले नाहीत. नोकऱ्या विक्री प्रकरणाचा उगम कुठून झाला हे सर्वांनाच ठाऊक आहे. सरकारने कोणाचीही गय केलेली नाही. नोकर भरतीसाठी आता कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून २८५ पदे जाहीर केली. ही सर्व पदे पारदर्शक पद्धतीने भरली जाणार आहेत. सावंत सरकारने भू- बळकाव प्रकरणात कडक कारवाई केली. चौकशीसाठी आयोग नेमला. शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत यासाठी कायदा केला. अशा अनेक चांगल्या गोष्टी केल्याने विरोधकांना ते खुपते आहे.

'कारवाईसाठी सर्व खुले' 

आरोप बिनबुडाचे आहेत तर मग बदनामीचा खटला का घालत नाही, असा प्रश्न मंत्री फळदेसाई यांना केला असता ते म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सबबीखाली असे खटले फेटाळले जातात. परंतु प्रवक्ते गिरिराज पें वेर्णेकर यांनी असा स्पष्ट इशारा दिला की, जर का विरोधकांनी निराधार आरोप चालूच ठेवले तर त्यांच्यावर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार आम्ही करू.

मुख्यमंत्री व कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप थांबवा 

नोकऱ्या विक्री प्रकरणी विरोधक पातळी सोडून बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार सडेतोडपणे निर्णय घेत आहे. शिवाय प्रशासनही सुरळीत चालले आहे. ते न पाहवल्यानेच अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा