गोव्यात २७ जागा मिळवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 00:58 IST2016-08-21T00:58:36+5:302016-08-21T00:58:36+5:30

गोवा विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकाच, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे कार्यकर्त्यांना केले. २०१७ मध्ये गोवा जिंकून

Get 27 seats in Goa | गोव्यात २७ जागा मिळवाच

गोव्यात २७ जागा मिळवाच

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकाच, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे कार्यकर्त्यांना केले. २०१७ मध्ये गोवा जिंकून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गोव्यात रचावा, असे ते म्हणाले.
भाजपा गोव्याला भ्रष्टाचारमुक्त शासन देईल. गेल्या साडेचार वर्षांत आमच्या पक्षाने गोव्याला स्थिर सरकार दिले. आयाराम-गयारामांचे हे सरकार नव्हते. अनेक कल्याणकारी योजना सरकारने लोकांसाठी राबविल्या. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला २१ जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत २७ जागा मिळायलाच हव्यात, असेही ते म्हणाले. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात हे संमेलन पार पडले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Get 27 seats in Goa