शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

गोव्यात सुरे तलवारीसह गँगवॉर, ४ जखमी, ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 10:16 PM

मेरशी येथे पुन्हा एकदा तलवारी, सुरी वंदुका घेऊन हाणामारीचा प्रकार घडला.

पणजी: मेरशी येथे पुन्हा एकदा तलवारी, सुरी वंदुका घेऊन हाणामारीचा प्रकार घडला. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास येथील गोवेकर रेस्टॉरंटजवळ झालेल्या दोन गटांतील मारामारीत ४ जण जखमी झाले असून इस्पितळात उपचार घेत आहेत.सहा जणांना जुने गोवा पोलिसांनी अटक केली आहे.रात्रीच्यावेळी येथील बार एण्ड रेस्टॉरंटमध्ये चिंबलचे काही युवक बसले होते. त्यानंतर तिथे मेरशीतील एक गट आला आणि दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. बाचाबाची नंतर मारामारीवर आली. दोन्ही गटात भीषण हाणामारी होवून ४ जण जखमी झाले आहेत. चौघांनाही गोमेकॉत दाखल करण्यात आले. पोलीसांनी ६जणांना अटक केली आहे तर पळून गेलेल्या इतरांच्या शोधात पोलीस आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मारामारीतील एक गट चिंबलचा तर दुसरा गट मेरशी येथील आहे. चिंबलचा गट मेरशी येथील गोवेकर बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये बसलेला असता तेथे मेरशीचा गट अला. चिंबलच्या गटातील युवकांची नावे जोशुआ तलवार, मुबारक मुल्ला, शेनबाज मुल्ला, नियाझ बेग, अख्तर मुल्ला, अब्दुल मालदार, समीर मुल्ला, अतिफ निरगी आणि निसार नामक एक असून सर्व ९ जण हे चिंबल येथील आहेत. मेरशी गटातील युवकांची नावे सुरज शेट्ये, मार्शेलीन डायस, विशाल गोलतकर आणि गौरेश् नाईक अशी आहेत. सर्वजण मेरशी येथे राहणारे आहेत. दोन्ही गटांतील युवक हे गुन्हेगारी पार्श्वभुमिचे आहेत. यापूर्वीही त्यांचा अनेक गुन्ह्यात समावेश होता.मेरशीत रेस्टॉरंटजवळ मारामारी चालू असल्याची माहिती पोलिसांना कुणी तरी फोन करून दिली. पोलीस त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ८ जणांना अटक करण्यात आले. जखमींना इस्पितळात नेले तर इतर पळून गेले. त्या ठिकाणी तलवारी, सुरे पोलिसांना सापडले. पोलिसांनी दोन मोटरसायकल व पाच स्कूटरही जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे.मेरशीतील दोन गटांच्या या गँगवॉरमुळे सुमारे ९ महिन्यापूर्वी याठिकाणी झालेल्या गुंढगिरीच्या घटनांच्या लोकांच्या स्मृती ताज्या झाल्या. गोव्याबाहेरून आलेल्या एका पर्यटक परिवारावर येथील पाच सहा गुंढांनी सशस्त्र हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते. अगधी शुल्लक करारणावरून भांडण उरकून काढून त्या पर्यटक परिवारांतील सदस्यांना रक्तबंबाळ करण्याची घटना या ठिकाणी घडली होती. या घटनेमुळे गोव्याची देशभर नाचक्की झाली होती.मागे गोव्याबाहेरील पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात ज्या गुंढांनी सहभाग घेतला होता त्यातील दोघांचा सहभाग या मारामारीतही होता. त्या प्रकरणातून हे जामीनवर सुटले होते. जामीनवर असताना इतकी गुंढगिरी तर बिनशर्त सुटका केल्यास ते काय करतील याची कल्पनाही करवत नसल्याचे तेथील लोक सांगतात. शब्बील मुल्ला, नियाज बेग, अख्तर मुल्ला, मार्शेलीन डायस, विशाल गोलतेकर, गौरेश नाईक अशी आहेत. सुरज शेटये हा सतत तीनवेळा गुन्हेगारी प्रकरणात अडकलेला असून या हाणामारीत तोच सर्वाधिक जखमी झाला आहे. गोमेकॉत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.