बाणावली सरपंचांचे भवितव्य उद्या ठरणार

By Admin | Updated: May 7, 2014 01:00 IST2014-05-06T16:46:19+5:302014-05-07T01:00:46+5:30

मडगाव : बाणावलीच्या सरपंचा रॉयला फर्नाडिस यांच्याविरुध्द ७ पंचांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी गुरुवार ८ मे रोजी पंचायतीची खास बैठक बोलावण्यात आली आहे. या प्रकरणातील गंमत म्हणजे सरपंच रॉयला या ११ मार्च ते १५ मे पर्यत व्यक्तीगत कामासाठी रजेवर आहेत व सध्या उपसरपंच झेव्हीयर परेरा यांच्याकडे सरपंचपदाची सूत्रे आहेत. अविश्वास ठरावावर रेमेदियु फर्नाडिस, रिटा फुर्तादो, लॉरेन्स फर्नाडिस, झेव्हीयर परैरा, पीटर जोन्स, ॲमी डिकॉस्ता व कायतान रिबेलो, ई फर्नाडिस यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. विकासकामाबाबत इतरांना विश्वासात न घेणे, सहकार्य न करणे अशी कारणे या नोटिशीत देण्यात आली आहेत. आपण सुट्टीवर असताना झालेल्या या ठरावाबाबत आश्चर्य व्यक्त करताना रॉयला यांनी अशा ठरावाला भिऊन आपण पदत्याग करणार नाही तर या ठरावाचा सामना करणार अस

The future will be tomorrow's tomorrow | बाणावली सरपंचांचे भवितव्य उद्या ठरणार

बाणावली सरपंचांचे भवितव्य उद्या ठरणार

मडगाव : बाणावलीच्या सरपंचा रॉयला फर्नाडिस यांच्याविरुध्द ७ पंचांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी गुरुवार ८ मे रोजी पंचायतीची खास बैठक बोलावण्यात आली आहे. या प्रकरणातील गंमत म्हणजे सरपंच रॉयला या ११ मार्च ते १५ मे पर्यत व्यक्तीगत कामासाठी रजेवर आहेत व सध्या उपसरपंच झेव्हीयर परेरा यांच्याकडे सरपंचपदाची सूत्रे आहेत. अविश्वास ठरावावर रेमेदियु फर्नाडिस, रिटा फुर्तादो, लॉरेन्स फर्नाडिस, झेव्हीयर परैरा, पीटर जोन्स, ॲमी डिकॉस्ता व कायतान रिबेलो, ई फर्नाडिस यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. विकासकामाबाबत इतरांना विश्वासात न घेणे, सहकार्य न करणे अशी कारणे या नोटिशीत देण्यात आली आहेत. आपण सुट्टीवर असताना झालेल्या या ठरावाबाबत आश्चर्य व्यक्त करताना रॉयला यांनी अशा ठरावाला भिऊन आपण पदत्याग करणार नाही तर या ठरावाचा सामना करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The future will be tomorrow's tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.