शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

मूर्ती भंजनातील पाचव्या प्रकरणात तरी फ्रान्सिस्कोवर आरोप निश्चित होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 5:01 PM

मडगाव : मूर्ती तोडफोडीच्या चार प्रकरणातून यापूर्वीच निर्दोष मुक्त झालेल्या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या विरुद्धच्या पाचव्या श्रीकृष्ण मंदिर तोडफोड प्रकरणातील आरोप निश्चितीपूर्वीचे युक्तिवाद पूर्ण झाले

मडगाव : मूर्ती तोडफोडीच्या चार प्रकरणातून यापूर्वीच निर्दोष मुक्त झालेल्या फ्रान्सिस परेरा उर्फ बॉय याच्या विरुद्धच्या पाचव्या श्रीकृष्ण मंदिर तोडफोड प्रकरणातील आरोप निश्चितीपूर्वीचे युक्तिवाद पूर्ण झाले असून, यासंबंधीचा निकाल 12 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे या पाचव्या प्रकरणात तरी संशयितावर आरोप निश्चित होणार का, हे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कालरुस दा सिल्वा यांच्यासमोर युक्तिवाद पूर्ण झाला. 3 जुलै रोजी रात्री संशयिताने कालकोंडा-मडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील नंदीच्या मूर्तीची तसेच तुळशी वृंदावनाची तोडफोड केल्याचा त्याच्यावर आरोप असून, या प्रकरणात सरकारी वकील तसेच संशयिताच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. संशयिताचे वकील अ‍ॅड. एरिक कुतिन्हो यांनी संशयिताने पोलीस कोठडीत दिलेल्या जबानी व्यतिरिक्त अन्य कुठलाही पुरावा पोलीस सादर करू न शकल्यामुळे याही प्रकरणात संशयिताला आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करावे, अशी मागणी केली.सदर संशयिताला कुडचडे पोलिसांनी कुडचडे सिमेंट्री क्रॉस मोडतोड प्रकरणात अटक केली होती. या अटकेनंतर आरोपीने अशा प्रकारची दीडशेपेक्षा जास्त कृत्ये आपण केल्याची कबुली दिली होती. यातील पाच प्रकरणांत त्याच्यावर आरोपपत्रही दाखल झाले होते. पण पाचपैकी चार प्रकरणात आरोप निश्चितीपूर्वीच न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले आहे.