वालंकांच्या रडारवर चौघेजण

By Admin | Updated: July 28, 2014 02:20 IST2014-07-28T02:15:29+5:302014-07-28T02:20:17+5:30

दिग्विजय सिंह, जॉन, रेजिनाल्ड, उत्कर्षविरुद्ध श्रेष्ठींकडे छळाची तक्रार करणार

The four-wheeler on the valve's radar | वालंकांच्या रडारवर चौघेजण

वालंकांच्या रडारवर चौघेजण

पणजी : गोवा प्रदेश युवाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी, तसेच आपला मानसिक छळ चालविल्याबद्दल काँग्रेसचे गोवा पक्षप्रभारी दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस, आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, उत्कर्ष रुखवते या चौघांविरुद्ध श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे वालंका आलेमाव यांनी स्पष्ट केले आहे.
शनिवारी तिला युवक कॉँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर वालंका आलेमाव यांनी हे आरोप केले. काका आजारी असताना आधीच आपली मन:स्थिती ठीक नाही. त्यात आपला छळ चालला असल्याचे त्या म्हणाल्या. काका आजारातून बरे झाल्यानंतर श्रेष्ठींना भेटून तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे वालंका यांना निलंबित करण्यात आल्याने आता त्यांच्यावरील पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे आणि पक्षातून त्यांची हकालपट्टी होऊ शकते, असे गोवा प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ज्या चारजणांना प्रदेशाध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या त्यामध्ये वालंका यांचाही समावेश होता. (पान २ वर)

Web Title: The four-wheeler on the valve's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.