शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात चार लाख कोविड चाचण्या पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:00 IST

CoronaVirus News Goa: गेल्या आठ महिन्यांत राज्यात एकूण ४८ हजार ३०० हून जास्त लोकांना कोविडची बाधा झाली. काही पर्यटक व परराज्यांतील काही लोकांचीही चाचणी गोव्यातच झाली. त्यामुळे बाधितांचा आकडाही मोठा दिसतो.

पणजी : राज्यातील सध्याचा कोविड चाचण्यांचा वेग जर लक्षात घेतला तर, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात गोव्यात एकूण ४ लाख कोविड चाचण्या पूर्ण झालेल्या असतील हे स्पष्ट होत आहे. सध्या ३ लाख ५३ हजारहून जास्त चाचण्या झाल्या आहेत. सुमारे ४६ हजार २०० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

गेल्या आठ महिन्यांत राज्यात एकूण ४८ हजार ३०० हून जास्त लोकांना कोविडची बाधा झाली. काही पर्यटक व परराज्यांतील काही लोकांचीही चाचणी गोव्यातच झाली. त्यामुळे बाधितांचा आकडाही मोठा दिसतो. गेल्या दोन महिन्यांत राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. १९ ऑक्टोबर रोजी राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या एकूण ३ हजार २८३ होती. आता ही संख्या १ हजार ४०० पर्यंत खाली आली आहे. पूर्वी दिवसाला रोज सरासरी सात रुग्णांचे जीव जात होते. आता हे प्रमाण तीनपर्यंत खाली आले आहे. नोव्हेंबर महिन्यात बळींची संख्या घटली.

मध्यंतरी राज्यात कोविड चाचण्यांची संख्या कमी झाली होती. बाराशे किंवा दीड हजार चाचण्या होत होत्या. आता रोज सुमारे दोन हजार चाचण्या होत आहेत. चार दिवसांपूर्वी तर सलग दोन दिवस प्रत्येकी अडिच हजार कोविड चाचण्या झाल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढले तरी, नव्या रुग्णांची संख्या जास्त वाढलेली नाही. सध्या ११७ ते १५० नवे कोविड रुग्ण आढळत आहेत. पुढील तिस दिवसांत सुमारे पन्नास हजार कोविड चाचण्या पूर्ण होतील. म्हणजेच राज्यात आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांचे प्रमाण जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात चार लाख होईल. दि. ३ जानेवारीपर्यंत चार लाख चाचण्या पूर्ण झालेल्या असतील. सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात चार लाख चाचण्या हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा निश्चितच जास्त असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या