शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

आयुर्वेदाच्या राष्ट्रीय संस्थेसाठी गोव्यात महिन्याभरात पायाभरणी, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 12:16 IST

पणजी : धारगळ- पेडणो येथे राष्ट्रीय आयुर्वेदा संस्था तसेच आयुर्वेदीक हॉस्पिटल आणि राष्ट्रीय नेचोरपथी संस्था या प्रकल्पाच्या कामासाठी येत्या महिन्याभरात पायाभरणी केली जाईल, असे केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.नाईक यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की धारगळ येथील जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात आली ...

पणजी : धारगळ- पेडणो येथे राष्ट्रीय आयुर्वेदा संस्था तसेच आयुर्वेदीक हॉस्पिटल आणि राष्ट्रीय नेचोरपथी संस्था या प्रकल्पाच्या कामासाठी येत्या महिन्याभरात पायाभरणी केली जाईल, असे केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.नाईक यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की धारगळ येथील जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात आली आहे. राज्य सरकारशी समझोता करारही झाला आहे. गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील आठवडाभरात प्रस्ताव मंजुर केला जाईल व लगेच पायाभरणीचा सोहळा आयोजित केला जाईल. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पावर पाचशे कोटी रुपये केंद्रीय आयुष मंत्रालय खर्च करणार आहे. त्यानंतर आणखी पाचशे कोटींचा खर्च येईल. गोव्यात जे विदेशी पर्यटक येतात, त्यांना योगाचे व आयुर्वेदाचे आकर्षण आहे. त्यांचीही पाऊले धारगळकडे वळावीत असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. वैद्यकीय पर्यटन अशा प्रकारे वाढीस लागेल. धारगळमधील प्रकल्पात गोमंतकीयांना आरक्षण असेल व तशी तरतुद आम्ही कराराद्वारेही केली आहे. धारगळ येथील इस्पितळ हे शंभर खाटांचे असेल.मंत्री नाईक म्हणाले, की गोव्यात आयुष मंत्रलयाने दोन जिल्हास्तरीय इस्पितळे मंजुर केली आहेत. मोतीडोंगर-मडगाव येथे एक इस्पितळ उभे राहिल. त्याचीही पायाभरणी पुढील महिन्याभरात केली जाऊ शकते. वेळगे- साखळी येथे दुसरे इस्पितळ उभे राहिल. पन्नास खाटांचे हे इस्पितळ असेल. आयुष मंत्रलयाने गोवा सरकारकडे त्यासाठी पंधरा कोटींचा निधी दिला आहे. ही दोन्ही जिल्हास्तरीय इस्पितळे राज्य सरकारने बांधणो अपेक्षित आहे. त्यात आयुष मंत्रलयाला भूमिका नाही. गोवा सरकारनेच जमीन स्वत:च्या ताब्यात घेऊन इस्पितळे उभी करावीत.मंत्री नाईक म्हणाले, की देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयुष मंत्रलयाचे प्रत्येकी एक इस्पितळ असावे असे अपेक्षित आहे. आम्ही आतार्पयत देशभरात शंभर इस्पितळे मंजुर केली आहेत. निधीचीही तरतुद केली आहे.औषधांवीना उपचारांसाठी शिबिर दरम्यान, मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा आणि डॉ. मनोज शर्मा आयुव्रेदिक न्युरो इस्पितळ व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुव्रेदिक न्युरो थेरपी वैद्यकीय शिबिर येत्या 21 रोजी गोव्यातील गोवावेल्हा येथे आयोजित करण्यात आले आहे. गोव्यात पहिल्यांदाच असे शिबिर होत आहे. यापूर्वी राजस्थान व अन्य राज्यांमध्ये शिबिरे झाली आहेत. न्युरो थेरपी, कॅपिंग थेरपी, अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर, अग्नीकर्म ह्या सुविधा शिबिरात उपलब्ध असतील. सहा दिवस हे शिबिर चालेल व त्यात रोज चारशे रुग्ण तपासले जातील. वीस खाटांची सोय असेल, असे मंत्री नाईक यांनी सांगितले. फ्रोजन शोल्डर, मायग्रेन पेन, पॅरालिसीस, अँंकर पेन, टेसीन एल्बो, स्पीप डिस्क, नी ज्यॉइंट पेन, वोकल कॉड समस्या, सर्वीकल पेन यावर शिबिरात औषधांवीना आणि श क्रियेवीना उपचार केले जातील.