'ड्रग्स प्रकरणात एसआयटी करणार माजी गृहमंत्र्यांची चौकशी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 21:30 IST2018-08-05T21:29:30+5:302018-08-05T21:30:28+5:30
ड्रग्स माफिया व पोलीस यांच्यातील कथित संबध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून एसआयटीकडून त्यांनाही समन्स जाणार आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र रॉय नाईक यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेण्यात आली होती.

'ड्रग्स प्रकरणात एसआयटी करणार माजी गृहमंत्र्यांची चौकशी'
पणजी: ड्रग्स माफिया व पोलीस यांच्यातील कथित संबध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून एसआयटीकडून त्यांनाही समन्स जाणार आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र रॉय नाईक यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेण्यात आली होती.
रॉय नाईक यांच्या चौकशीनंतर या प्रकरणाशी संबंधित आणखी काही जणांना एसआयटीकडून समन्स पाठविण्यात आले होते. त्यांची चौकशी करुन जबानीही नोंदवून घेण्यात आली आहे. या प्रकरणातील प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळून आल्यास या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यापूर्वी माजी गृहमंत्री रवी नाईक यांची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांकूडन देण्यात आली.
इस्रायली नागरीक दुदू याला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आल्यानंतर २००८ मध्ये अंमली पदार्थ लॉबी व पोलिसांचे संबंध उघडकीस आले होते. तर काही पोलिसांना आणि ड्रग्स एजंटनाही अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सीबीआयकडेही देण्यात आले होते, तसेच २०१२ मध्ये गोव्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमदार मिकी पाशेका यांच्या अध्यक्षतेखाली गोवा विधानसभेची सभागृह समितीही नियुक्त करण्यात आली होती. या समितीने चौकशी करुन २०१३ मध्ये सादर केलेल्या अहवालात रॉय नाईक यांचा संबंध ड्रग्स लॉबीशी असल्याचा निष्कर्ष लावला. परंतु, भाजप सरकारमधीलच दोन आमदार व या सभागृह समितीचे सदस्य विष्णू वाघ आणि मायकल लोबो यांनी हा अहवाल स्विकारला नव्हता. त्यावर स्वाक्षरी करण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर हा अहवाल क्राईम ब्रँचच्या स्वाधीन करून चौकशीचा आदेश सरकारने दिला होता.