गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको व मॅथ्यू दिनिजवर उद्या आरोप निश्चितीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:38 IST2018-12-03T20:38:04+5:302018-12-03T20:38:12+5:30

माजोर्डा येथील कॅसिनो मारहाण प्रकरणी गोव्याचे माजी मंत्री माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको व त्यांचे मित्र  मॅथ्यू दिनिज यांच्यावर उदया आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.

Former Goa Minister Mickky Pacheco and Matthew Deniz | गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको व मॅथ्यू दिनिजवर उद्या आरोप निश्चितीची शक्यता

गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको व मॅथ्यू दिनिजवर उद्या आरोप निश्चितीची शक्यता

मडगाव: माजोर्डा येथील कॅसिनो मारहाण प्रकरणी गोव्याचे माजी मंत्री माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको व त्यांचे मित्र  मॅथ्यू दिनिज यांच्यावर उदया आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी दोन्ही संशयित न्यायालयात गैरहजर होते, त्यामुळे खटला पुढे ढकलण्यात आला होता.संशयित मॅथ्यू दिनिज यांनी आपल्यावर झालेल्या आरोप निश्चितीला सत्र न्यायालयात यापूर्वी आव्हान दिले होते. 23 ऑक्टोबर रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एडगर फर्नाडीस यांनी हा आव्हान अर्ज फेटाळून लावला होता. 
2009 मध्ये पाशेको हे पर्यटन मंत्री असताना  झालेल्या या प्रकरणात मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आश्विनी कांदोळकर यांनी पाशेको व दिनीज या दोघांविरोधात भादंसंच्या 448 (बेकायदा घुसखोरी), 384 (जबरदस्ती करणे) व 506-2 (गंभीर स्वरुपाची धमकी देणे) या गुन्हय़ाखाली आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. या निवाड्याला दिनिज यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
हा आव्हान अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी सरकारी वकील सुभाष देसाई यांनी करताना कनिष्ठ न्यायालयाचा निवाडा सुसंगत व योग्य असून त्यात हस्तक्षेप करण्यास कुठलाही वाव नाही. ही घटना प्रत्यक्ष पहाणारे अनेक साक्षीदार असून त्यामुळे  या खटल्यात सुनावणी घेऊन अभियोग पक्षाला पुरावे सादर करण्याची संधी देणो आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर संशयिताच्यावतीने बाजू मांडताना अॅड. विवेक नाईक यांनी आपल्या अशिलाला या खटल्यात विनाकारण गोवल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, माजोर्डा बीच रिसॉर्टमधील ‘कॅसिनो ट्रेझर्स’ या कॅसिनोतील अधिकारी अशोककुमार राव यांनी पाशेको व दिनीज यांच्या विरोधात कोलवा पोलीस स्थानकात तक्रार केली होती. 30 व 31 मे 2009 या दरम्यानच्या रात्री दोन्ही संशयितांनी माजोर्डा कॅसिनोत येऊन दंगामस्ती केली व आपल्याला जीवंत मारण्याची धमकी दिली. पाशेको यांनी कॅसिनोचा डिलर रेशम पोखरेल यालाही धमकावण्यास सुरुवात केली. आपण 3.69 लाख रुपये जिंकले असून तेवढी रक्कम आपल्याला देण्याचा तगादा त्यांनी पोखरेल याच्याकडे लावला होता, असे राव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते.

Web Title: Former Goa Minister Mickky Pacheco and Matthew Deniz

टॅग्स :goaगोवा