उत्तर गोव्याला पुराचा मोठा फटका, शेतीची हानी, 45 कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:31 IST2019-08-08T18:31:34+5:302019-08-08T18:31:47+5:30

तिळारी धरणासह अन्य ठिकाणचेही पाणी सोडावे लागल्याने उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांना जास्त फटका बसला.

Flood in North Goa, migration of 45 families | उत्तर गोव्याला पुराचा मोठा फटका, शेतीची हानी, 45 कुटुंबांचे स्थलांतर

उत्तर गोव्याला पुराचा मोठा फटका, शेतीची हानी, 45 कुटुंबांचे स्थलांतर

पणजी - तिळारी धरणासह अन्य ठिकाणचेही पाणी सोडावे लागल्याने उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांना जास्त फटका बसला. बार्देश, डिचोली व पेडणो तालुक्यातील एकूण 45 कुटूंबांचे तातडीने अन्यत्र स्थलांतर करावे लागले. पाण्याची पातळी सायंकाळीही कमी झालेली नाही. उत्तर गोव्यात शेतीची मोठी हानी झाली आहे.

बार्देशचे जुवे बेट, पेडणोतील बैलापूर तसेच डिचोलीतील साळ वगैरे भागातील लोकांच्या घरांमध्ये पाणी  घुसले. लोकांचे खूप हाल झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशा घरांना गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाबाहेर पत्रकारांना माहिती दिली. आपण रात्री दीड-दोन वाजेर्पयत विविध शासकीय यंत्रणांच्या संपर्कात होतो. काही आमदारांच्याही संपर्कात होतो. स्थितीवर सरकारचे लक्ष आहे. मदतकार्य सुरू झाले आहे. तीन तालुक्यांमध्ये शेतीचीही मोठी हानी झाली आहे पण मनुष्यहानी झाली नाही. सरकारी यंत्रणांनी तीन तालुक्यांमधील 4क् ते 45 कुटुबांचे अन्यत्र स्थलांतर केले. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्थाही करून घेण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्गमध्ये  खूप पाऊस पडत असल्याने तिळारी धरणातील पाणी तेथील यंत्रणांनी सोडले.

त्यांच्यासमोरही अन्य पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री  म्हणाले. सर्वाधिक फटका राणोंच्या जुवे बेटावरील लोकांना बसला. तिथे पंचवीस घरे असून त्या सर्व घरांमध्ये पाणी गेले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, तिसवाडी तालुक्यातील करंजाळे एक इसम त्याच्या वाहनासह जांबोटी येथे प्रवास करताना वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. 

Web Title: Flood in North Goa, migration of 45 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.