शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

गोव्यात ‘टिक टॉक’चा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:29 AM

मानेची धमनी तुटली : स्टंट शूट करीत असताना केरी-साळजिणीतील विद्यार्थ्याचे निधन

काणकोण :  मोबाइलवर ‘टिक टॉक’वर स्टंट करीत असताना मानेची धमनी (शीर) तुटल्याने मूळ केरी-साळजिणी येथील युवकाचे सोमवारी सायंकाळी निधन झाले.अर्धफोंड येथील बलराम उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेत शिकणारा सूरज रमेश गावकर (१७) सोमवारी सायंकाळी दाबेल-पैंगीण येथील आपल्या आत्याच्या घरी मोबाइलवर ‘टिक टॉक’ अ‍ॅपवर स्टंट शूट करीत होता. स्टंट करीत असतानाच त्याच्या मानेची धमनी तुटून त्याचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना दिल्यावर काणकोण पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मंगळवारी सायंकाळी त्याच्यावर केरी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावाचा असलेला सूरज हुशार विद्यार्थी होता, असे या विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर म्हाळशी यांनी सांगितले. सूरजच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच्या निवासस्थानी उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील व बहिणी असा परिवार आहे.

काय आहे टिक टॉक...?सोशल मीडियात प्रचंड क्रेझ असणाºया टिक टॉक अ‍ॅपवर हल्लीच बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. गुगलला प्ले स्टोअरमधून टिक टॉक अ‍ॅप काढण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता हा अ‍ॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र, ज्या लोकांकडे आधीपासून हा अ‍ॅप आहे, त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येतो. टिक टॉक अ‍ॅप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, काही जण या अ‍ॅपचा गैरवापर करून, अश्लील चित्रफितींना प्रोत्साहन देतात, असा आरोप करत त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने या अ‍ॅपवर बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर टिक टॉकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही मद्रास न्यायालयाचा निर्णय जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला. कंपनीने वर्षभरात ६० लाख पेक्षा अधिक व्हिडीओ टिक टॉकच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत.  मुळात म्युझिकली नाव असणाºया अ‍ॅपचे नाव टिक-टॉक करण्यात आले. भारतात सध्या  ९ कोटी लोक टिक टॉक अ‍ॅप वापरतात, असा अंदाज आहे. जगभरात १00 कोटी लोकांनी हा अ‍ॅप डाउनलोड केला आहे.