संपत्तीच्या वादातून गोव्यातील नेसाय येथे गोळीबार: संशयित फरार: घटनास्थळी सापडल्या दोन गोळया
By सूरज.नाईकपवार | Updated: November 2, 2023 13:02 IST2023-11-02T13:02:27+5:302023-11-02T13:02:39+5:30
लोकमत न्युजनेटवर्क मडगाव: संपत्तीच्या वादातून गोव्यातील दक्षिण गोवा येथील नेसाय येथे गोळीबार करण्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडला. या ...

संपत्तीच्या वादातून गोव्यातील नेसाय येथे गोळीबार: संशयित फरार: घटनास्थळी सापडल्या दोन गोळया
लोकमत न्युजनेटवर्क
मडगाव: संपत्तीच्या वादातून गोव्यातील दक्षिण गोवा येथील नेसाय येथे गोळीबार करण्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडला. या प्रकारामुळे हा गाव हादरुन गेला. मायणा कुडतरी पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी निलेश वेर्णेकर व अन्य दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. संशयित सदया फरार आहे. घटनास्थळी पोलिसांना बदुंकीच्या दोन गोळयाही सापडल्या. एकूण तीन फायरिंग केल्याचा संशय आहे. भादंसंच्या ३३६ व शास्त्रात कायद्यातंर्गंत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान गोळीबाराची वरील घटना घडली. कॉन्सी फर्नांडीस यांच्या घरासमोर एक जागा विकासीत करण्यात आली होती. कॉन्सीने दिवाणी न्यायालयात या प्रकरणात धाव घेतली होती. सदया हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
बुधवारी रात्री ब्लॅक टायगर या सुरक्षा एजन्सीचे मालक निलेश वेर्णेकर व अन्य दोघेजण घटनास्थळी आले व त्यांनी कॉन्सीच्या घराच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी त्या घरात आत फर्नांडीस कुटुबिय होते. सुदैवाने या गोळीबारा कुणी जखमी झाला नाही. गोळीबार केल्यानंतर संशयिताने घटनास्थळाहून पळ काढला.
मागाहून यासंबधी पाेलिसांना कळविण्यात आल्यानंतर संबधितांनी घटनास्थळी जाउन पंचानामा केला. संशयितांचाही शोध घेतला मात्र ते सापडू शकले नाही.