ईडीसी कार्यालयाच्या लीफ्टला लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही

By समीर नाईक | Updated: September 8, 2023 14:26 IST2023-09-08T14:25:26+5:302023-09-08T14:26:26+5:30

शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली.

fire broke out in the lift of edc office panaji goa fortunately there was no casualty | ईडीसी कार्यालयाच्या लीफ्टला लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही

ईडीसी कार्यालयाच्या लीफ्टला लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही

समीर नाईक, पणजी: गोवा आर्थिक विकास महामंडळच्या (ईडीसी) लिफ्टला शुक्रवारी अचानक आग लागल्याने महामंडळच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. लगेच अग्नीशामक दलाला बोलवण्यात आले, त्यांनी त्वरित घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली, आणि मोठी दुर्घटना होता होता वाचली.

शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. लिफ्टच्या एका बटन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली.   सुदैवाने ही घटना घडली तेव्हा लिफ्टमध्ये कुणीच नव्हते. आग लागताच मोठ्याने सायरन वाजण्यास सुरू झाले. त्यामुळे ही घटना कळाली.  सायरन वाजताच अनेक कर्मचारी थेट कार्यालयाच्या बाहेर आले. 

अग्निशामक दलाने सुरुवातीला आग नियंत्रणात आणली. नंतर लिफ्ट तळमजल्यावर आणून तिची पाहणी केली. या घटनेमुळे कार्यालयात सर्वत्र धूर पसरला होता. स्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात पाठविण्यात आले. नेमके किती आर्थिक नुकसान झाले हे मात्र अद्याप कळलेले नाही.

Web Title: fire broke out in the lift of edc office panaji goa fortunately there was no casualty

टॅग्स :goaगोवा