राजभवनतर्फे कॅन्सर पीडितांना अर्थसहाय; राज्यपालांच्याहस्ते रुग्णांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 15:27 IST2024-02-14T15:26:39+5:302024-02-14T15:27:26+5:30
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सर्व कॅन्सर पिढीत रुग्णांना राजभवनवर बाेलावून त्यांचा सन्मान केला

राजभवनतर्फे कॅन्सर पीडितांना अर्थसहाय; राज्यपालांच्याहस्ते रुग्णांचा सन्मान
पणजी : राजभवनतर्फे राज्यातील कॅन्सर पिढीत रुग्णांना अर्थ सहाय्य देण्यात आले. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच राजभवनमधील इतर अधिकारांच्या उपस्थितीत हे आर्थिक सहाय देण्यात आले. यावेळी राजभवनवर कवि कलेचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.
आमदार दिगंबर कामत म्हणाले, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची राज्यात राज्यपाल म्हणून निवड झाल्यानंतर अनेक समाजाभिमुख कार्यक्रम ते राबवित आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्यात अनेक गावांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी तळगाळातील लाेकांच्या समस्या जाणून घेतल्या. जास्तीत जास्त लाेकांच्या संपर्क साधला आहे. कुठल्याच राज्यपालांनी असे रुग्णांना अर्थ सहाय केले नव्हते राजभवनतर्फे कॅन्सर रुग्णांसाठी हे अर्थ सहाय केले जात आहे. राज्यपालांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. मी गेली ३० वर्षे आमदार आहे. पण अशा प्रकाराचे समाजाभिमुख कार्यक्रम कुठल्याच राज्यपालांनी अजून राबविलेले नाहीत.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सर्व कॅन्सर पिढीत रुग्णांना राजभवनवर बाेलावून त्यांचा सन्मान केला त्यांना अर्थ सहाय दिले तसेच त्यांच्यासाठी खास जेवणाची साेय केली होती. राज्यपाल दिव्यांगना असेच अर्थ सहाय करत आहेत. तसेच अनेक गरजू लोकांना ते मदत करतात. त्यांचे खास राजभवनवर बाेलावून स्वागत केले जाते. त्यांची खाण्यापिण्याची सोय केली जात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गरीब गरजू लाेकांना त्याचा लाभ हाेत आहे. राज्यपाल हे स्वत: एक लेखक असून त्यांनी ग्रामिण भागाचा सखोल अभ्यास केला आहे.