वास्को व परिसरात महिन्याला १०० हून अधिक नागरिकांचा कुत्रे घेतात चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 07:42 PM2019-09-13T19:42:06+5:302019-09-13T19:43:16+5:30

मुरगाव तालुक्याच्या रुग्णांसाठी सेवा देण्याकरीता उपलब्ध असलेल्या चिखली उपजिल्हा इस्पितळात दर महिन्याला कमीत कमी १०० रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारसाठी येत असल्याची माहीती सामोरे आली

fear of dog In Vasco area | वास्को व परिसरात महिन्याला १०० हून अधिक नागरिकांचा कुत्रे घेतात चावा

वास्को व परिसरात महिन्याला १०० हून अधिक नागरिकांचा कुत्रे घेतात चावा

Next

 - पंकज शेट्ये
 
वास्को - मुरगाव तालुक्याच्या रुग्णांसाठी सेवा देण्याकरीता उपलब्ध असलेल्या चिखली उपजिल्हा इस्पितळात दर महिन्याला कमीत कमी १०० रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारसाठी येत असल्याची माहीती सामोरे आली असून यापैंकी बहुतेकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतलेला असतो. गोव्यातील इतर तालुक्याबरोबरच मुरगाव तालुक्यात सुद्धा विविध भागात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री वाढल्याने याचा नागरीकांना विविध प्रकारे त्रास सोसावा लागतो. मागच्या दिड महीन्यात दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर दोन वेळा भटकी कुत्री फिरकल्याने दोन विमानांना सुद्धा धोक्याच्या सामोरे जावे लागले असून मुरगाव तालुक्यात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणावर आळा आणण्यासाठी कडक पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.

मुरगाव तालुक्यात वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी व मुरगाव असे चार मतदारसंघ येत असून ह्या चारही मतदारसंघात असलेल्या विविध भागात मागच्या काही काळात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणामुळे नागरीकांना याचा विविध प्रकारे त्रास सोसावा लागतो. मुरगाव नगरपालिकेच्या सडा भागातील कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या बाहेरील परिसरात तर मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री वाढलेली असून यामुळे ह्या भागातून प्रवास करणाऱ्या नागरीकांना त्यांचा धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीने अथवा चालत जाणा-या नागरिकांचा सदर भागातील कुत्रे मोठ्या प्रमाणात पाठलाग करत असून स्वताचा जीव वाचवण्यासाठी नागरीकांना त्यांच्या दुचाकीचे अथवा चालण्याचे वेग वाढवावे लागते.

सडा कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या बाहेरील परिसराती भटक्या कुत्र्यांनी मागच्या काही वर्षापूर्वी एक दोन वेळा छोट्या मुलांवर हल्ला केल्याने ह्या मुलांना गंभीर जखमी होण्याची पाळी निर्माण झाली होती. भटक्या कुत्र्यांनी दाबोळी विमानतळावरील विमान वाहतूक सेवेला सुद्धा मागच्या काळात हैराण केलेले असल्याचे दिसून आले असून विमानातून प्रवास करणाºया नागरीकांच्या तसेच विमान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत हा प्रकार धोकादायक सुद्धा ठरू शकतो. दरम्यान दाबोळी विमानतळ परिसरात भटकणा-या कुत्र्यांना दुस-या स्थळावर स्थलांन्तरीत करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आलेले आहे. एका महीन्याच्या काळात सुमारे ८३ भटक्या कुत्र्यांना दुस-या ठिकाणी हलवण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. वाढणाºया भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणावर आळा आणण्यासाठी विविध संबंधीत संस्था कुत्र्यांचे निर्भीजीकरण तसेच अन्य विविध पावले उचलत असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे, मात्र हे उपाय पुरेसे आहेत की त्यात वाढ करण्याची गरज आहे असा सवाल भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होणारी वाढ पाहून पडतो.

चिखली उपजिल्हा इस्पितळात प्रत्येक महीन्याला कमीत कमी १०० नागरीक कुत्र्याने चावा घेतल्याने उपचार घेण्यासाठी येत असल्याची माहीती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी देऊन यापैंकी बहुतेकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला असतो अशी माहीती दिली. कुत्र्यांने चावा घेतलेल्या रुग्णावर उपचार करण्याच्या औषधाचा पुरेसा साठा चिखली उपजिल्हा इस्पितळात उपलब्ध असतो असे बोरकर यांनी माहीतीत सांगितले.

मुरगाव नगरपालिकेने त्यांच्या हद्दीत असलेल्या भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम ‘पिपल्स फोर अ‍ॅनिमल’ ह्या संस्थेला दिलेले असल्याची माहीती मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी दिली. पालिकेने त्यांच्याशी याबाबत करार केलेला असून प्रत्येक भटक्या कुत्र्याच्या निर्बिजीकरणा मागे मुरगाव नगरपालिका त्या संस्थेला ९७५ रुपये देते. मे २०१७ ते ऑक्टोंबर २०१८ ह्या काळात मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील ८१६ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते तर नोव्हेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ ह्या काळात ३२९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याची माहीती शंखवाळकर यांनी पुढे दिली. पालिका हद्दीत वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणावर आळा आणण्यासाठी येणाºया काळात आणखीन अचुक पावले उचलण्यात येणार असे त्यांनी शेवटी सांगितले.

Web Title: fear of dog In Vasco area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.