शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बारा आमदारांचे भवितव्य २० रोजी ठरणार; सर्वोच्च न्यायालयाने बजावताच निवाडा लवकर देण्यास सभापती राजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 7:30 PM

सभापती राजेश पाटणेकर यांनी बारा आमदारांविरुद्धच्या दोन्ही अपात्रता याचिकांवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पूर्ण केली आहे.

पणजी : राज्यातील बारा आमदारांचे भवितव्य येत्या २० रोजी ठरणार असल्याचे अखेर मंगळवारी निश्चित झाले. २९ रोजी निवाडा देण्याची सभापतींची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही व त्यामुळे येत्या २० रोजी निवाडा देण्यास सभापती राजी झाले.

सभापती राजेश पाटणेकर यांनी बारा आमदारांविरुद्धच्या दोन्ही अपात्रता याचिकांवर गेल्या फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पूर्ण केली आहे. आपण निवाडा २९ रोजी देईन असे सभापतींनी सोमवारी काँग्रेस व मगोपच्या याचिकादारांना सांगितले होते. मात्र मंगळवारी दुपारी अडिच वाजता सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील अपात्रता याचिकेचा विषय सुनावणीस आला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सभापतींची भूमिका मान्य केली नाही. फेब्रुवारीतच सुनावणी पूर्ण झालेली असल्याने सभापतींनी निवाडा देण्यास आणखी विलंब करू नये ही याचिकादारांच्या वकिलाची भूमिका सर्वोच्च न्यायालयाला पटली. 

पुढील आठवडाभरात निवाडा देता येईल काय असे तुम्ही सभापतींना विचारा असे न्यायालयाने सॉलिसीटर जनरलना सांगितले. सॉलिसीटर जनरल मग सभापतींनीबोलले व  २२ एप्रिल रोजी निवाडा देऊ असे सांगितले गेले. तथापि, न्यायालयाने २० रोजी निवाडा द्यावा असे सांगितले व सभापती त्यास तयार झाले. सभापती काय निवाडा देतात याकडे पूर्ण गोव्याचे लक्ष लागून आहे. सभापतींनी लवकर याचिका निकालात काढाव्यात म्हणूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व मगोपचे नेते सुदिन ढवळीकर हे सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत. २० रोजी सभापतींनी निवाडा देताच २१ रोजी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, मंत्री दिपक पाऊसकर, फिलिप नेरी रॉड्रीग्ज, जेनिफर मोन्सेरात अशा एकूण बारा मंत्री- आमदारांविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनी निवाडा दिल्यानंतर मग कदाचित नव्याने न्यायालयीन लढाई उच्च न्यायालयाच्या स्तरावर सुरू होईल. या बारा आमदारांनी अचानक स्वत:चे पक्ष बदलून भाजपमध्ये उडी टाकलेली आहे.

टॅग्स :goaगोवा