लोकसभेसाठी विषय नसल्याने विरोधकांकडून खोटे आरोप : मंत्री माविन गुदिन्हो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 15:38 IST2024-01-20T15:38:33+5:302024-01-20T15:38:42+5:30
- नारायण गावस पणजी: कॉँग्रेसकडे आता लाेकसभेच्या प्रचारासाठी काही विषय नसल्याने ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. काेमुनिदादमध्ये दुरुस्ती ...

लोकसभेसाठी विषय नसल्याने विरोधकांकडून खोटे आरोप : मंत्री माविन गुदिन्हो
- नारायण गावस
पणजी: कॉँग्रेसकडे आता लाेकसभेच्या प्रचारासाठी काही विषय नसल्याने ते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. काेमुनिदादमध्ये दुरुस्ती करुन जागा हडप केली असे कॉँग्रेसने केलेले आरोप चुकीचे आहे. जर यात त्यांना भ्रष्टाचार दिसत असेल तर माझ्या मुलाने ४०० मीटर जागेसाठी केलेेला अर्ज मी रद्द करायला सांगणार आहे. आम्ही या ४०० मीटर जागेवर नाही असे स्पष्टीकरण पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले. या विषयी कॉँग्रेसने त्यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते.
काेमुनिदादमध्ये दुरुस्ती बदल केला आहे तो लोकांच्या भल्यासाठी सरकार किवा मंत्र्यांकडून कोमुनिदादची जागा हडप करण्यासाठी नाही. पण आता कॉँग्रेसकडे भाजपवर आरोप करण्यासाठी एकही विषय नसल्याने असे मिळेल ते विषय घेऊन आरोप केले जात आहेत. आता अयोध्येत राम मंदिर पूर्ण झाले आहे. सर्वत्र भाजपमय वातावरण आहे. त्यामुळे कॉँग्रेसच्या दोन्ही जागा ाराज्यातून जाणार हे त्यांना माहित आहे. त्यामुळे मिळेल तसे आरोप त्यांच्याकडून केले जात आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
या कॉँग्रेसच्या नेत्यांवर असा अब्रुनुकसानीचा दावा करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच महत्वच नाही त्यामुळे त्यांनी कितीही आरोप केले म्हणून आमचे काहीच हाेणार नाही. राज्याची जनता ही भाजपसोबत आहे. आमच्या सरकारने माेठ्या प्रमाणात विकास केला आहे. साधनसुविधा सर्वत्र केल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा मोदीजीच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार येणार आहे, असेही माविन गुदिन्हाे यांनी सांगितले.