शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तुयेतील विशेष मुलांसाठी सुविधा वाढवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:31 IST

आमदार जीत आरोलकर यांच्यासह पेडणेतील शैक्षणिक संस्थांना भेट : समस्या जाणल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे तुये येथील आत्मविश्वास विद्यालयाला दिलेल्या भेटीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष मुलांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासपद्धती, दैनंदिन उपक्रम व प्रगती यांची माहिती घेतली. शिक्षकांकडून आलेल्या सूचना व समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. 

तुये हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथील विशेष मुलांचे 'आत्मविश्वास विद्यालय' तसेच पेडणे येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देत शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आमदार जीत आरोलकर हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री व आमदार जीत आरोलकर यांनी पेडणेतील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. येथे सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेत वाचनालयाची स्थिती, शाळेतील सुविधा तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मुख्याध्यापकांकडून माहिती घेतली. शैक्षणिक संस्थांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन आवश्यक ते सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

आवश्यक सुविधांवर भर

काही विशेष मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे प्रगती करत असून, त्यांना पुढील शिक्षणासाठी मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये समाविष्ट करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना सूचना केल्या. विशेष मुलांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षितता तसेच आवश्यक सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या इमारतीचा प्रस्ताव

यावेळी शिक्षिका गावडे व शिक्षक सीताराम गावडे यांनी मुख्यमंत्री व आमदारांचे स्वागत केले. संस्थापक सीताराम गावडे यांनी माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आमदार जीत आरोलकर यांच्या सहकार्यामुळे विद्यालयासाठी साडेतीन हजार चौरस मीटरहून अधिक जागा उपलब्ध झाल्याचे सांगितले. या जागेवर नव्या इमारतीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tuem Special Needs Facility to Expand: CM Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant visited Tuem's 'Atmavishwas Vidyalaya,' interacting with special children. He assured support for their education and facilities. He also reviewed Pedne's school infrastructure, promising government assistance for comprehensive development, including a new building proposal for the special needs school.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण