शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

कर्करोग विभागासाठी तज्ज्ञ गोमेकॉतूनच मिळविणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 8:49 PM

नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्करोग विभागासाठी लागणारे सर्व तज्ज्ञ डॉक्टर हे गोमेकॉतूनच घेण्यात येणार आहेत.

- वासुदेव पागीपणजी - नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्करोग विभागासाठी लागणारे सर्व तज्ज्ञ डॉक्टर हे गोमेकॉतूनच घेण्यात येणार आहेत. गोमेकॉतील कन्सल्टंट रेंकच्या डॉक्टरना रेसिडेंट म्हणून घेऊन प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले जाणार आहे. मुंबई येथील टाटा मेमोरियल कर्करोक इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा बोरकर यांच्या नेतृत्वाखाली गोमेकॉत कर्करोग विभाग सुरू करण्यात आला आहे. रविवारी त्याचे औपचारीकरित्या उद्घाटनही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गोमेकॉतील वॉर्डक्रमांक १४८ मध्ये सुरू करण्यात आलेला हा विभाग अद्याप तसा प्रत्यक्ष कार्यरत होवून रुग्णांना दाखल करून घेऊ लागला नसला तरी काम वेगाने सुरू आहे. सध्या सध्या या विभागासाठी बायो कॅबिनेट्स बसविण्याचे काम सुरू आहे. इतर बरीचशी कामेही व्हायची आहेत. परंतु कर्करोग विभागासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तज्ज्ञ डॉक्ट मंडळी  आहे. तज्ज्ञ डॉक्टर हे गोमेकॉतीलच नियुक्त केले जाणार आहेत. गोमेकॉतील अनेक विभागात काम करणाºया डॉक्टरना या विभागात आपले करियर करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी कन्सल्टंट रेंकच्या डॉक्टरना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ अनुपमा बोरकरच देतील.  गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवानंद बोरकर यांनी ही माहिती दिली. गोमेकॉतील सर्व कन्सल्टंटना हा विषय सांगण्यात आलेला आहे. तसेच अनेकांनी कर्करोगात काम करण्याची इच्छाही व्यक्त केलेली आहे. येत्या काही दिवसात गोमेकॉत या संबंधात अनेक बदल घडताना दिसून येणार आहेत. या सुपरस्पेशलिटी विभागाचे प्रमुख म्हणून जसे टाटा मेमोरियलमधील डॉ अनुपमा बोरकर यांना गोमेकॉच्या सेवेत आणले गेले तसे इतर प्रत्येक तज्ज्ञांना बाहेरून घेणे अश्यक असल्यामुळे गोमेकॉतूनच हा विभाग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही न्युरोसर्जरी व युरोसर्जरी सारखे जे सुपरस्पेशलीटी विभाग सुरू करण्यात आले तेही अशाच पद्धतीने सुरू करण्यात आले होते.

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटल