माहितीची देवाण-घेवाण वॉट्सअ‍ॅपमधून नको!

By Admin | Updated: January 7, 2015 01:27 IST2015-01-07T01:26:27+5:302015-01-07T01:27:12+5:30

प्रशासकीय अधिकाऱ्यांना आयटी तज्ज्ञांचा सल्ला

Exchange of information is not from Whatsapp! | माहितीची देवाण-घेवाण वॉट्सअ‍ॅपमधून नको!

माहितीची देवाण-घेवाण वॉट्सअ‍ॅपमधून नको!

पणजी : सरकारी खात्यातील गोपनीय माहिती एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देताना वॉट्सअ‍ॅप ग्रुपचा वापर करू नका असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सायबर सल्लागार वकुल शर्मा यांनी गोव्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
माहिती तंत्रज्ञान खात्याच्या ई-गव्हर्नन्स परिषदेत बोलताना वकुल शर्मा यांनी हा सल्ला दिला. ते म्हणाले की ज्या अ‍ॅप्सचे सोर्स देशाबाहेर आहेत त्यावर विसंबून राहू नका, वॉट्सअ‍ॅप हे विदेशातून चालविले जाते. वॉट्सअ‍ॅपवरील माहिती गोपनीय राहत नसल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. तसेच पोलीस तपासालाही वॉट्सअ‍ॅप सहकार्य करीत नसल्याचेही ते
म्हणाले. त्यामुळे गोपनीय माहितीची वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देवाणघेवाण करणे जोखमीचे असल्याचे ते म्हणाले.
सायबर गुन्हे विषयावर बोलताना आयटी सल्लागार रक्षीत टंडन यांनीही वॉट्सअ‍ॅप सहीत सर्वच विदेशी आणि देशीही सॉफ्टवेअरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. टोरंट्स व इतर अ‍ॅप्सच्या माध्यमातून मालवेरर्स आणि इतर व्हायरस पसरत असतात. आपल्या संगणकावरील, मोबाईलवरील गोपनीय माहितीही ते मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
ई-मेल वापरताना एनआयसीचा सोर्स असलेला ई-मेल वापरणे कमी जोखमीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अत्यंत कठीण असे पासवर्ड टाकणे, पासवर्ड वारंवार बदलणे या गोष्टी सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Exchange of information is not from Whatsapp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.