११ वारसा स्थळांवर प्रवेश शुल्क; पुरातत्त्व खात्याची अधिसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:07 IST2025-01-03T08:06:14+5:302025-01-03T08:07:23+5:30
यासंबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली आहे.

११ वारसा स्थळांवर प्रवेश शुल्क; पुरातत्त्व खात्याची अधिसूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील काही किल्ले, गुहा आदी अकरा वारसा स्थळांवर प्रवेशासाठी आता शुल्क लागू होणार आहे. यासंबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली आहे.
शापोरा किल्ला, हळर्ण किल्ला, काब द राम किल्ला, खोर्जुवे किल्ला, खांडेपार-फोंडा येथील पांडवांची गुहा, कोळंब-रिवण येथील रॉक काव्हिंग, नार्वा-दिवाडी येथील सप्तकोटेश्वर मंदिर, सांत इस्तेव्ह येथील किल्ला, मुरगाव किल्ला, साखळी किल्ला, जुने गोवे येथील अवर लेडी ऑफ मोंत कपेल या पुरातन स्थळांचा यात समावेश आहे. ही सर्व पुरातन स्थळे संरक्षित पुरातन वास्तू म्हणून अधिसूचित केली आहेत. पुरातत्त्व खात्याचे संचालक तथा पदसिद्ध संयुक्त सचिव निलेश फळदेसाई यांनी ही अधिसूचना काढली आहे.