मार्चपर्यंत इएसआयसीचे शवागार वापरास खुले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं विधानसभेत निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:49 IST2017-12-18T15:49:25+5:302017-12-18T15:49:31+5:30
मडगाव हॉस्पिसियो इस्पितळातील शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कर्इमचारी राज्य विमा महामंडळाच्या (इएसआयसी) इस्पितळातील नवीन शवागार मार्च महिन्यापर्यंत वापरासाठी खुले करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले.

मार्चपर्यंत इएसआयसीचे शवागार वापरास खुले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं विधानसभेत निवेदन
पणजी- मडगाव हॉस्पिसियो इस्पितळातील शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कर्इमचारी राज्य विमा महामंडळाच्या (इएसआयसी) इस्पितळातील नवीन शवागार मार्च महिन्यापर्यंत वापरासाठी खुले करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले.
आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळातील शवागारात नेहमीच मृतदेह ठेवण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे लक्ष्य वेधले. नेहमीच या शवागारातील काही कँबिनेट्स नादुरुस्त पडत असल्यामुळे मृतदेह घेऊन लोकांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जावे लागते. सांगे, केपे, काणकोण सारख्या भागातील लोकांना याचा फार त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एक तर हॉस्पिसियोत अतिरिक्त केबिनेटची व्यवस्था करण्यात यावी किंवा इएसआयसी इस्पितळातील शवागार पूर्ण होत आले असल्यामुळे ते उपयोगात आणले जावे अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी इएसआयसी इस्पितळातील शवागार फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या सुरूवातीस वापरास सुरू क रण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. त्याच बरोबर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात 5 अतिरिक्त कॅबिनेट पुरविण्याचा विचाधीन असल्याचे आरोग्यमंत्त्री आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.