शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे गोव्यात सागरी जीव संपत्तीला धोका

By admin | Updated: July 14, 2016 18:41 IST

गोव्यातील किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव संपत्तीला धोका निर्माण झाला असल्याचे येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या

-  एनआयओ शास्रज्ञांकडून सहा किनाऱ्यांचा अभ्यास पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव संपत्तीला धोका निर्माण झाला असल्याचे येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहत येऊन किनाऱ्यांवर धडकणारा प्लास्टिक कचरा धोकादायक बनला आहे. केरी, वागातोर, कळंगुट, कोलवा, मोबोर व गालजीबाग किनाऱ्यांचा अभ्यास सहा किनाऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर शास्रज्ञांनी हे अनुमान काढले आहे. एनआयओ शास्रज्ञांनी नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रकाशित केला. त्यात असे म्हटले आहे की, प्लास्टिक कचऱ्याबरोबरच समुद्रात जहाजांमधून अपघाताने होणारी तेल गळती यामुळेही किनारी पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. मायक्रोप्लास्टिक पॅलेटस्मुळे निर्माण झालेला धोका यावर या संशोधन अहवालात भाष्य करण्यात आले आहे. या पॅलेटसची रासायनिक प्रक्रिया तसेच मान्सूनमध्ये होणाऱ्या अन्य परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील शास्रज्ञ माहुआ साहा, एस. वीरसिंगम, व्ही. सुनील, पी. वेथामोनी, अँड्रिया कार्मेलिता रॉड्रिग्स, सौरव भट्टाचार्य व बी.जी. मलिक यांनी या संशोधन कार्यात भाग घेतला. मान्सूनमध्ये समुद्रातील प्रवाहामुळे कचरा वाहत येऊन किनाऱ्यांना लागण्याचे प्रकार घडतात. समुद्रात अपघाताने जहाजातून तेल गळती होते. प्लास्टिक फिल्म, फायबर, फ्रॅगमेंटसही वाहत येतात. समुद्रातून वाहत येणारा प्लास्टिक कचरा आढळून आला तरी राज्यातील खाडींमध्ये असे आढळले नाही.