खाणींमुळे साळावली, ओपा दूषित
By Admin | Updated: July 24, 2014 01:27 IST2014-07-24T01:24:36+5:302014-07-24T01:27:41+5:30
पणजी : साळावली तसेच ओपा प्रकल्पाचे पाणी खाणींमुळे दूषित होत असल्याने महालेखापालांनी अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. लोकांना शुद्ध पाणी पुरविण्याची

खाणींमुळे साळावली, ओपा दूषित
पणजी : साळावली तसेच ओपा प्रकल्पाचे पाणी खाणींमुळे दूषित होत असल्याने महालेखापालांनी अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. लोकांना शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी बांधकाम खात्याने घ्यावी, असे बजावण्यात आले असून त्याबाबत योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे.
हा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर करण्यात आला. साळावली धरणाच्या पाण्यातील मँगनिज अंश ही बांधकाम खात्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे पाणी प्रदूषित होत आहे. पावसाळ््यात खनिज वाहून येते आणि पाण्यात मिसळते. यासंबंधी खाण संचालनालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये पाहणीही केली होती; परंतु त्याचा अहवाल महालेखापालांना दिलेला नाही.
२००८ ते २०१३ या पाच वर्षांच्या काळात साळावलीच्या पाण्यात मँगनिजचे प्रमाण लक्षणीय आढळून आले. बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियमावलीनुसार शुद्धीकरण केलेल्या पाण्यात प्रति लिटर ०.०५ मिलिग्रॅम मॅँगनिज अंश स्वीकारार्ह आहे; परंतु हे प्रमाण प्रति लिटर ०.०९ मिलिग्रॅम ते 0.५ मिलिग्रॅमपर्यंत लक्षणीय आढळून आले. ते स्वीकारार्ह प्रमाणापेक्षा दहा पटींनी अधिक आहे.
(प्रतिनिधी)