शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पर्यटन व्यवसायासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 3:08 PM

गोवा एरव्ही शांत व सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र वेगवेगळ्य़ा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण 2017 साली वाढले.

पणजी - गोवा एरव्ही शांत व सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र वेगवेगळ्य़ा प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण 2017 साली वाढले. खुनाचे व अपहरणांचे प्रमाण घटले आहे पण बलात्कार, घरफोडया व चो-यांचे प्रमाण वाढले आहे. गोव्यातील वाढती गुन्हेगारी ही पर्यटन व्यवसायासमोर हळूहळू आव्हान उभी करू लागली आहे व त्यामुळे पर्यटनव्यवसायाशीनिगडीत विविध घटक चिंताग्रस्त बनताना दिसून येत आहे. गोव्यात गुन्हे वाढत असल्याचे पर्यटकांना दिसून आले तर गोवा हे असुरक्षित पर्यटन स्थळ बनण्यास वेळ लागणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.वर्ष संपायला आले, की पोलिस खाते वर्षभरातील सगळ्य़ा गुन्ह्यांबाबच्या आकडेवारीचे विश्लेषण करत असते. यावेळीही गोव्यातील सर्व पोलिस स्थानकांमधील आकडेवारीचे खात्याने विश्लेषण केले आहे. सरकारला ही आकडेवारी सादर झाली आहे. विविध गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण 2क्16 च्या तुलनेत 2क्17 साली वाढले आहे. पण वाढीचे हे प्रमाण केवळ 1 टक्का आहे. अलिकडेच क्रॉस मोडतोड प्रकरणांच्या मालिकेतील संशयीत बहुतांश खटल्यातून दोषमुक्त झाला व पोलिस खात्याच्या क्षमतेबाबत लोकांमध्ये मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीनांचे विनयभंग, लैंगिक छळ होण्याच्या घटना राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातही घडत आहेत. स्थलांतरित मजुरांचे प्रमाण अशा प्रकरणी आरोपी म्हणून जास्त आहे. गोव्यात बांधकाम व्यवसाय आणि पर्यटन व्यवसाय वाढत आहे. या दोन्ही व्यवसायांमधून काही अपप्रवृत्ती पुढे येत आहेत. परप्रांतांमधून प्रचंड मजुरांची फौज गोव्यात आली व या दोन्ही व्यवसाय क्षेत्रंमध्ये ती जास्त स्थिरावली आहे. औद्योगिक वसाहती, बार्ज व्यवसाय, ट्रॉलरद्वारे मासेमारीचा धंदा आणि खनिज व्यवसायातही अनेक परप्रांतीय मजुर दिसून येतात. 9क् टक्के ट्रक ड्रायव्हर हे झारखंड, बिहार व अन्य परराज्यांतील आहेत. गोव्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय मजुर व कामगारांचे प्रमाण हे खूप आहे. स्थानिक युवकांचे प्रमाणही गुन्ह्यांमध्ये दिसून येत आहे. सांगेत नुकताच तरुणाचा जो खून झाला, त्यात सगळे स्थानिकच आहेत. गोव्यात 2क्17 साली अपहरणांचे 86 गुन्हे घडले. त्यापैकी 52 अपरहणांचा छडा लागला. उर्वरित अपहरण प्रकरणांचा गुंता अजून कायम आहे. बारा महिन्यांत बलात्काराची 7क् प्रकरणो पोलिसांत नोंद झाली. त्यापैकी 69 प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. एकूण 174 घरफोडय़ांचे गुन्हे नोंद झाले. त्यापैकी फक्त 6क् प्रकरणांचा तपास यशस्वी झाला. खून करण्याचा प्रयत्न करण्याचे 24 गुन्हे नोंद झाले व त्या सर्व प्रकरणांचा छडा लागला. एकूण 3क् खुनांची नोंद मावळत्या वर्षाने केली. त्यापैकी 24 खुनांचा तपास लागल्याचे पोलिस खात्याची आकडेवारी दाखवून देत आहे.गोव्यातील वाढती गुन्हेगारी ही पर्यटन व्यवसायासाठी धोक्याची घंटा आहे. कळंगुटचे आमदार तथा हॉटेल व्यवसायिक मायकल लोबो यांनी यापूर्वी पोलिस बंदोबस्त महत्त्वाच्या ठिकाणी वाढवावा, पोलिसांना नवी वाहने द्यावीत व पोलिसांचे इंटेलिजन्स वाढावे, अशा मागण्या जाहीरपणो केल्या आहेत. विधानसभेतही लोबो यांनी भूमिका मांडून पर्यटन क्षेत्रतील वाढती अस्वस्थताच एक प्रकारे उघड केली आहे. अंमली पदार्थ व्यवहारांशीनिगडीत सर्वाधिक प्रकरणो 2क्17 साली नोंद झाली. पोलिसांना याचे श्रेय जाते पण मोठे ड्रग्ज वितरक व पुरवठादार पडद्याआडच राहिले असून छोटे विक्रेते सापडत आहेत. काही आमदारांनीही यापूर्वी अशी टीका केली आहे. 

टॅग्स :goaगोवा