पणजी-म्हापसा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात वाहन चालकाचा मृत्यू
By काशिराम म्हांबरे | Updated: November 29, 2023 16:07 IST2023-11-29T16:06:56+5:302023-11-29T16:07:18+5:30
आपल्या चारचाकी गाडीतून पणजीवरून सदर वाहन चालक म्हापसाच्या दिशेने जात होता.

पणजी-म्हापसा राष्ट्रीय महामार्गावर अपघातात वाहन चालकाचा मृत्यू
म्हापसा: पणजी म्हापसा या राष्ट्रीय महामार्गावर पर्वरी नजीक असलेल्या गिरी येथेआज दुपारी ३ वाजण्याच्या अंदाजाला झालेल्या भीषण अशा स्वयं अपघातात वाहन चालक जुआँव डिसोझा (७८) याचा मृत्यू झाला आहे.
आपल्या चारचाकी गाडीतून पणजीवरून सदर वाहन चालक म्हापसाच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या माडाला त्यांनी जोरदार धडक दिली. दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की त्यात माड मोडून गाडीवर कोसळून पडला. त्यात गाडीच्या बहुतांश भागाचा चेंदामेंदा झाला होता.
अपघातावेळी गाडीत वाहन चालक एकटाच होता. गंभीर अवस्थेत गाडीत अडकून पडलेल्या वाहन चालकाला नंतर स्थानीकांनी बाहेर काढले. लागलीच त्याला रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोवा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
वाहन चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात घडण्यास कारण ठरल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिली. घडलेल्या अपघाताचा तपास सुरु करण्यात आला आहे.