शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या पार्थिवावर बुधवारी होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 9:31 PM

गोव्याचे माजी महसूल तथा क्रीडामंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचे सोमवारी रात्री मुंबईच्या हिंदुजा इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाले होते.

वास्को - गोव्याचे माजी महसूल तथा क्रीडामंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचे सोमवारी (दि.९) रात्री मुंबईच्या हिंदुजा इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाल्यानंतर आज (दि.९) दुपारी त्यांचे पार्थिव गोव्यात चिखली, दाबोळी येथील निवास्थानावर आणण्यात आले. उद्या (दि. १०) सकाळी त्यांचे पार्थिव सेंट अ‍ॅन्ड्रु चर्चमध्ये नेल्यानंतर ख्रिस्ती धर्मानुसार प्रार्थना सभा केल्यानंतर खारीवाडा, वास्को येथील हिंदु स्मशानभूमीत त्यांचा मृतदेह नेऊन येथे तो दहन करण्यात येणार आहे. डॉ. विल्फे्रड मिस्किता जरी ख्रिस्ती बांधव असले तरी निधनानंतर त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्यात यावी अशी त्यांची शेवटची इच्छा असल्याने त्यांच्या कुटूंबाकडून ती पूर्ण करण्यात येणार आहे.डॉ. विल्फे्रड मिस्किता यांचा मृतदेह आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निवास्थानावर आणण्यात आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवास्थानावर उपस्थिती लावून त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली. यात गोव्याचे नगरविकासमंत्री मिलींद नाईक, आमदार चर्चिल आलेमांव, गोव्याची माजी कायदामंत्री रमाकांत खलप, मुरगावचे माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर अशा अनेकांचा समावेश होता. बुधवारी (दि.१०) सकाळी १०.३० वाजता डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचा मृतदेह त्यांच्या निवास्थानावरून प्रथम वास्कोच्या सेंट अ‍ॅन्ड्रु चर्चमध्ये नेण्यात आल्यानंतर येथे ख्रिस्ती धर्मानुसार प्रार्थना करण्यात येणार आहे. यानंतर येथून त्यांचा मृतदेह खारीवाडा येथील हिंदु स्मशानभूमीत नेण्यात आल्यानंतर येथे त्यांना दहन करण्यात येणार आहे. डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांचा मुलगा लीयोन मिस्किता यांना याबाबत माहीती घेण्यासाठी संपर्क केला असता आपल्या वडीलाची अशी शेवटची इच्छा असल्याची माहीती त्यांनी दिली. जरी डॉ. मिस्कीता ख्रिस्ती असले तरी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्यात यावी अशी त्यांची शेवटची इच्छा होती अशी माहीती त्यांचे पूत्र लीयोन यांनी देऊन ती पूर्ण करण्यात येणार अशी माहीती त्यांनी याप्रसंगी दिली.डॉ. विल्फ्रेड मिस्किता १९९४ सालात वास्को मतदारसंघातून मगो पक्षावरून आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर त्यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांनी ह्या काळात गोव्याचे महसूलमंत्री तसेच क्रीडामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेली होती. १९९४ ते १९९९ अशा काळात त्यांनी वास्कोचे आमदार म्हणून काम केल्यानंतर झालेल्या पुढच्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी कॉग्रेस पक्षावरून निवडणूक लढवली, मात्र यावेळी त्यांना पराभव पतकारावा लागला. डॉ. मिस्किता यांनी मगो, भाऊसाहेब बांदोडकर गोमंन्तक पक्ष, कॉग्रेस तसेच भारतीय जनता पक्षात विविध पदे सांभाळलेली होती. डॉ. मिस्किता यांनी २००७ सालात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ह्या पक्षाचे गोवा राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते अशी पदे सांभाळलेली असून त्यांची भाजप सरकारच्या काळात एनआरआय आयुक्त म्हणूनही निवड केल्याने ह्या कामाची जबाबदारी सांभाळलेली होती.डॉ. मिस्किता यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते वास्कोतील नामावंत गायनॅकॉलॉजी डॉक्टर (चिकित्सक) म्हणून प्रसिद्ध असून त्यांचे वडील स्व: डॉ. मावरेनीयो मिनेझीस मिस्किता हे सुद्धा त्याकाळचे प्रसिद्ध डॉक्टर म्हणून वास्कोत ओळखले जात होते. डॉ. विल्फे्रड मिस्किता यांच्या पत्नी डॉ. फातीमा मिस्किता ह्या वास्कोतील प्रसिद्ध डोक्याच्या (आय स्पेशालीस्ट) डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असून मिस्किता यांच्या कुटूंबातील अनेक सदस्य वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. डॉ. मिस्किता यांना एक पूत्र व कन्या असून पूत्र इंन्जिनियर तर एक मुलगी इंन्जिनियर तर दुसरी मुलगी वकील आहे. निधनाच्या वेळी डॉ. मिस्किता ७० वर्षाचे होते.

टॅग्स :goaगोवा