‘मगो’ला सरकारमधून हटवणार नाही!

By Admin | Updated: January 20, 2015 02:14 IST2015-01-20T02:10:47+5:302015-01-20T02:14:59+5:30

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सरकारमधून हटविण्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य ज्येष्ठ भाजप नेते मुळीच विचार करत नाहीत, हे सोमवारी स्पष्ट झाले.

Do not remove Mago from government! | ‘मगो’ला सरकारमधून हटवणार नाही!

‘मगो’ला सरकारमधून हटवणार नाही!

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सरकारमधून हटविण्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य ज्येष्ठ
भाजप नेते मुळीच विचार करत नाहीत, हे सोमवारी स्पष्ट झाले.
भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांची व निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री सुरू झाली. मात्र आमदार विष्णू वाघ बैठकीत सहभागी झाले नाहीत. तसेच उद्योगमंत्री महादेव नाईक दिल्लीत असल्याने तेही बैठकीत भाग घेऊ शकले नाहीत. सरकारची प्रगती कशी काय आहे, विविध मंत्र्यांकडून भाजपच्या आमदारांची कामे केली जातात की नाही, विविध योजनांबाबत लोक खुश आहेत की नाही याविषयी बैठकीत ढोबळ मानाने चर्चा झाली. काही आमदारांनी आपली मते मांडली. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असल्याने त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पार्सेकर मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच अशा स्वरूपाची बैठक सुरू झाली असून ती आज संपुष्टात येईल. चिंतन बैठक तथा श्रम परिहार, असेही बैठकीचे स्वरूप आहे.
पाच वर्षांसाठी युतीस कौल
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म.गो. पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत २०१२ च्या निवडणुकीवेळी भाजप व मगोची युती झाली होती. ही युती पाच वर्षांसाठी होती. लोकांनी मगो-भाजप युतीला पाच वर्षांसाठी कौल दिलेला असल्याने आता युती तोडायचा भाजपचे नेते विचार करत नाहीत, असे संकेत काही मंत्र्यांकडून मिळाले. युतीविरुद्ध फक्त एक-दोन आमदारच बोलत आहेत. युती तोडून पुढे जाणे हे थोडे अवघड ठरेल, असे मत काही भाजप नेते व्यक्त करत आहेत.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Do not remove Mago from government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.