शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका; भाजप समर्थकांना दामू नाईक यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 09:13 IST

कुडतरीत कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भाजप समर्थकांनी विरोधी पक्षांच्या अपप्रचाराला बळी पडू नये. देशाला महासत्ता बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना पाठिंबा द्या, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी (दि. ७) कुडतरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. यावेळी आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, भाजप नेते अँथनी बाबर्बोझा, शर्मद पै रायतूरकर, प्रभाकर गावकर उपस्थित होते.

दामू नाईक म्हणाले की, कुडतरी मतदारसंघात भाजप वाढविण्यासाठी ३१ सदस्यांचे पथक काम करेल. गेल्या काही महिन्यांपासून मी गोव्यात ३८ मेळावे आयोजित करून ४० हजार कार्यकर्त्यांना भेटलो. सर्व भाजप स्वयंसेवकांनी भाजप सरकारने जनहितासाठी आणलेल्या योजना विसरू नयेत.

मेळाव्याला परिसरातील कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा प्रतिसाद

यावेळी आमदार उल्हास तुयेकर यांच्यासह उपस्थित नेत्यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. तसेच सरकारी योजना सर्वसामन्यांना समजावून सांगण्याचे आवाहनही केले. ज्यामुळे लोकांना भाजप सरकार राबवित असलेल्या योजनांची माहिती मिळविण्यासाठी सोपे जाईल. मेळाव्यासाठी भाजप कार्यकर्त्यांबरोबरच परिसरातील समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉक्टर निलंबनाची माहिती घेणार

दरम्यान, मेळाव्यानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरच्या निलंबन प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. नाईक म्हणाले की, ते या प्रकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांशी बोलतील आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतील.

समाजासाठी काम करा : कामत

मडगावचे आमदार कामत म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी प्रत्येक राज्याची गरज ओळखली आणि लोकांसाठी विविध योजना आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मोदींचे स्वप्न भारताला पुन्हा एकदा महासत्ता आणि समृद्ध देश बनवण्याचे आहे.

भाजपच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा करावी. काँग्रेस पक्ष भाजपविरुद्ध फक्त चुकीचा प्रचार करत आहे, परंतु मोदी यांनी लोकांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी काय केले आहे हे लोकांनी आठवले पाहिजे.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण